घरताज्या घडामोडीVarun Dhawan: अभिनेता वरुण धवनच्या ड्रायव्हरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Varun Dhawan: अभिनेता वरुण धवनच्या ड्रायव्हरचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

वांद्र्याच्या मेहबूब स्टूडिओमध्ये वरुणचे शुटींग सुरू होते. मनोज वरुणला घेऊन मेहबूब स्टूडिओला पोहचले. वरुणने शुटींग सुरू केले. मनोज मेहबूब स्टूडिओतच होते आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन ( Varun Dhawan)  सध्या कठीण काळातून जातोय. वरुणच्या ड्रायव्हरचे मंगळवारी संध्याकाळी अचानक निधन झाले. मनोज असे त्यांचे नाव आहे. (Actor Varun Dhawan driver manoj dies due to heart attack)  गेली अनेक वर्ष ते वरुण धवनकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होते. वरुणच्या आयुष्यातील अनेक चांगल्या वाईट घटनांचे ते साक्षीदार होते. मनोज यांच्या मृत्यूपश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. त्यांच्या जाण्याने वरुणला मोठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

मंगळवारी संध्याकाळी वांद्रे येथील मेहबूब स्टूडिओ येथे मनोज यांना अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. वरुणने दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्याच्या मेहबूब स्टूडिओमध्ये वरुणचे शुटींग सुरू होते. मनोज वरुणला घेऊन मेहबूब स्टूडिओला पोहचले. वरुणने शुटींग सुरू केले. मनोज मेहबूब स्टूडिओतच होते आणि अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. वरुण देखील मनोज यांच्या सोबत लीलावती रुग्णालयात होता. बरेच तास वरुण त्यांच्यासाठी धावपळ करत होता. मात्र डॉक्टरांनी मनोज यांना मृत घोषित केले.

वरुण धवन मनोज यांना आपल्या जवळची व्यक्ती मानायचा. मनोज आणि वरुण यांच्या कमाल बॉडींग होते. त्यांच्या जाण्याने वरुणला मोठा धक्का बसला आहे. मनोज वरुणला तो लहान असल्यापासून ओळखत होते. वरुणच्या अनेक लहान मोठ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. वरुणचे वडील डेविड धवन यांचेही ते आधी ड्रायव्हर होते. वरुण सिनेसृष्टीत आल्यानंतर ते वरुणचे ड्रायव्हर म्हणून काम करु लागले. मनोज यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन्ही मुलांची आणि घराची काळजी वरुण घेणार आहे असे वचन त्याने वडील डेव्हिड धवन यांना दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पती वरुण धवनला अभिनयात टक्कर देण्यासाठी नताशा दलाल सज्ज; ओटीटीवर करणार पर्दापण

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -