घरमहाराष्ट्रनाशिकमेथीची भाजी, भाकरी आणि सुषमाजींच्या आठवणींची शिदोरी

मेथीची भाजी, भाकरी आणि सुषमाजींच्या आठवणींची शिदोरी

Subscribe

नाशिक भेटीदरम्यान सुषमा स्वराज यांनी सीमा हिरे यांच्या निवासस्थानी पाहुणचार घेत त्यांचं तोंड भरुन कौतुकही केलं.

भारतीय राजकारणातील “मदरलेडी” अर्थात सुषमा स्वराज यांच्या निधनाने त्यांच्या नाशिक भेटीतील आठवणींचे स्मरण झाले. 2004 सालात डॉ. डी. एस. आहेर यांच्या विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सुषमा स्वराज नाशिकला आल्या होत्या.

नाशिक दौर्‍यादरम्यान स्वराज यांनी सीमा हिरे यांच्या निवासस्थानी आवर्जुन भेट दिली आणि पाहुणचारही स्विकारला. आपल्या निखळ स्वभावानुसार त्यांनी अस्सल महाराष्ट्रीयन साधं जेवणाची इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी मेथीची भाजी व भाकरी आवडीने खाल्ली. सुषमाजींच्या या भेटीप्रसंगी लक्ष्मण सावजी, माजी आमदार निशिगंधा मोगल, भाजप नेते विजय साने, दिवंगत पोपटराव हिरे, भाजप नेते बंडोपंत जोशी उपस्थित होते.

- Advertisement -

भाजपतर्फे आज सर्वपक्षीय शोकसभा

भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने भाजपची मोठी हानी झाली आहे. सुषमा स्वराज अनेकवेळा विविध कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये येऊन गेल्या. त्यांचे ऋणानुबंध लक्षात घेता त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिक महानगर भाजपतफ गुरुवारी, ८ ऑगस्टला सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. वसंतस्मृती कार्यालय, एन. डी. पटेलरोड येथे दुपारी ४ वाजता शोकसभा सुरू होईल. पक्षाचे सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -