घरमुंबईचोर समजून केलेल्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

चोर समजून केलेल्या मारहाणीत इसमाचा मृत्यू

Subscribe

याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. परिसरातील सीसीटीव्हीतून हत्येचा उलगडा झाला.

कल्याण रेल्वे स्थानकासमोरील भाजी मार्केटमध्ये एका इसमाला चोर समजून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मात्र या मारहाणीत या इसमाचा मृत्यू झाला आहे. जोंगोल लोहरा (४८) असं मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संदेश जाधव आणि राजू झिबऱ्या या आरोपींसह एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – हिंजवडीत दारूसाठी पोलिसाची दादागिरी; घटना सीसीटीव्हीत कैद

आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली

कल्याण पश्चिम येथील भाजी मार्केटच्या रस्त्याच्या बाजूला बुधवारी सकाळी जोंगोल लोहरा या इसमाचा हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या व्यक्तीच्या खिशातील आधार कार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. जोंगोल हा ठाणे येथे राहणार असून, मूळचा झारखंडचा रहिवाशी आहे. प्रथमदर्शनी या व्यक्तीची हत्या झाल्याचे पोलिसांना प्राथमिक तपासात दिसून आले. या हत्येबाबत कोणताही सुगावा नसल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. यावेळी मध्यरात्री ५ जण या इसमाला मारहाण करीत असल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले. पोलिसांनी तात्काळ घटनेच्या तपासाला सुरूवात केली. त्यानंतर अवघ्या तासाभरात संदेश जाधव आणि राजू झिबऱ्या या दोघांना ताब्यात घेतले. चोर असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची कबूली त्यांनी दिली. मात्र चोरीच्या संशयातून जोंगोलची हत्या करण्यात आली? की अन्य काही कारण आहे? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -