घरमहाराष्ट्रनाशिकजेव्हा आमदार करतात चोराचा पाठलाग

जेव्हा आमदार करतात चोराचा पाठलाग

Subscribe

आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या सतर्कतेमुळे इंदिरानगर परिसरात पळून जात असलेला चोरटा ताब्यात

इंदिरानगर परिसरातील युनियन बँकेलगत लूट करुन पळून जात असलेल्या एका चोरट्याला आमदार देवयानी फरांदे यांनी आपल्या वाहनातून पाठलाग करत अंगरक्षकाच्या मदतीने पकडल्याची घटना शनिवारी घडली.

आमदार फरांदे या खासगी कामानिमित्त इंदिरानगर परिसरातून जात असताना बँकेच्या परिसरात त्यांना गोंधळ उडालेला दिसला. बँकेत दहशत निर्माण करत लूट केल्यानंतर पळून जात असलेल्या एका चोरट्याला नागरिकांनी पकडलेले होते, तर दुसरा पळून जात होता. ही बाब लक्षात येताच प्रा. फरांदे यांनी प्रसंगावधान राखत तातडीने चोराचा पाठलाग करण्याची चालकाला सूचना केली. चोर टप्यात येताच प्रा. फरांदे व अंगरक्षक संतोष पाटील यांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आमदारांचे हे धाडस परिसरात चर्चेचा विषय ठरले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -