घरमहाराष्ट्रनाशिकवाहन टोईंग कारवाईच्या पोलिसांकडून हालचाली; सद्यस्थितीत ई-चलनद्वारे दंड वसुलीचा मात्र विसर

वाहन टोईंग कारवाईच्या पोलिसांकडून हालचाली; सद्यस्थितीत ई-चलनद्वारे दंड वसुलीचा मात्र विसर

Subscribe

स्वप्नील येवले । नाशिक 

नाशिक शहरातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून वाहन टोईंगची कारवाई सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शहरात नो पार्किंगमधील वाहनांच्या टोईंगची कारवाई बंद करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मार्च महिन्यात घेतला होता. त्यावेळी वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या संबंधित वाहन मालकांकडून थेट ई-चलानद्वारे दंडवसुली करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

- Advertisement -

नाशिक शहराची जशी लोकसंख्या वाढत आहे, त्याचबरोबर वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे शहरात पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. वाहनचालकांकडून शहरात कुठेही वाहन पार्क केले जात आहे., परिणामी नागरिकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागते. गतवर्षी पोलिसांकडून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी थेट वाहन टोईंगची कारवाई सुरु करण्यात आली होती. मात्र, टोईंग ठेका संपल्याने आणि नागरिकांसह स्थानिक पक्षांनी आवाज उठवल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी टोईंगची कारवाई थांबवली होती. परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा एकदा टोईंगची कारवाई सुरू झाली होती. तेव्हा देखील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. गेल्या वर्ष दोन-तीन वर्षांपासून टोईंगचा मुद्दा नाशिकमध्ये गाजत होता. नव्याने रूजू झालेले पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरात आता टोईंग दिसणार नाही. मात्र, थेट वाहन मालकांच्या मोबाईलवरच दंडाची पावती येणार असल्याची घोषणा केली होती.

नो पार्किंगमधील वाहनांना ई-चलनद्वारे दंड वसुलीचा विसर

नाशिक शहरात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी पार्किंग सुविधा उपलब्ध नसतानाही शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून टोईंग कारवाई केली जात होती. परंतु, या कारवाईबाबत नागरिक संताप व्यक्त करत होते. शहरात वाहने पार्किंगसाठी पुरेशी जागा उपलब्ध करुन द्यावी किंवा टोईग कारवाई बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. याची दखल पोलीस आयुक्तांनी घेत टोईंगबाबतचा आदेश रद्द करत थेट ई-चलानद्वारे दंड वसुली करण्याबाबत स्पष्ट केले होते. मात्र, नो पार्किंगमधील वाहनाच्या मालकांना ई चलनव्दारे दंड सुनावला जात नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाहन टोईंग नको रे बाबा

नाशिक शहरात वाहन चालकांना टोईंगची कारवाई म्हंटल्यावर अंगावर काटा उभा राहतो. कारण टोईंग वाहनावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची आणि त्या गाडीत ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांकडून दादागिरी केली जाते. त्यातून नागरिक आणि पोलीस कर्मचारी व टोईंग कर्मचार्‍यांच्यामध्ये वाहन वाद होतात. त्यामुळे वाहन चालक टोईंग कारवाई सुरू होणार म्हटल्यावर त्यांच्या तोंडून नको रे बाबा असे म्हणत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -