घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र : निवडणूक कार्यक्रम जाहीर

मविप्र : निवडणूक कार्यक्रम जाहीर

Subscribe

नाशिक : जिल्ह्यातील सभासदांचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीसाठी 28 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दुसर्‍या दिवशी 29 ऑगस्टला मतमोजणी होईल. मविप्र शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी (२०२२-२७ ) निवडणूक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. भास्करराव खंडेराव चौरे तर सदस्य म्हणून अ‍ॅड काशिनाथ रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश वसंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवादाचे सचिव म्हणून संस्थेतील प्रा.डॉ. ज्ञानेश्वर काजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवादाची नियुक्ती झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेस लवकरच प्रांरभ होईल.

मविप्र संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.31) रोजी पार पडली. यावेळी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना हिरे, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खातळे, दतात्रय पाटील, उत्तमबाबा भालेराव, डॉ विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, रायभान काळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, अशोक पवार, हेमंत वाजे आदी उपस्थित होते. निवडणूक मंडळाकडे तालुकानिहाय अंतिम मतदार याद्या, संस्थेची घटना,नियमावली संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने सरचिटणीस व सभापती यांनी सुपूर्द केल्या. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. साधारणत: महिन्याभराची ही प्रक्रिया असून सप्टेंबर महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एक सदस्यीय लवादही

मविप्र संस्थेच्या निवडणुकीसाठी एक सदस्यीय लवादाची नियुक्ती करण्यात आली असून अ‍ॅड शिवाजीराव खालकर यांना संस्थेच्या वतीने नेमणूक पत्र देण्यात आले.

संभाव्य निवडणूक कार्यक्रम

मविप्र निवडणुकीत उमेदवारी अर्ज वाटप करण्यासाठी 5 ते 11 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 7 ते 11 ऑगस्ट अशी मुदत दिली जाईल. संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी 16 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाणार आहे. माघारीसाठी उमेदवारांना 19 ऑगस्टला संधी दिली जाईल. मतदान 28 तर मतमोजणी 29 ऑगस्टला पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -