पुढचा नंबर ‘त्यांचा’ असू शकतो, निलेश राणेंनी कोणावर साधला निशाणा?

तो व्हिडीओ समाजमाध्यांवर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ते आईला नतमस्तक करतानाही दिसत आहे. यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. 

Nilesh rane

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी निश्वास सोडला आहे. नितेश राणेंनी अनिल परबांवर पुढचा निशाणा साधला आहे. तर भाजप नेते निलेश राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत पुढचा नंबर तुमचा असू शकतो असं म्हटलं आहे. एक ट्विट करून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. (Nilesh rane commented on sanjay raut controversy targeted shivsena leader Uddhav Thackeray)

हेही वाचा – देर न हो जाए कहीं देर न हो जाये; नितेश राणेंकडून शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला मिश्किल टोला

ट्विट करत निलेश राणे म्हणाले की, दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो.

दरम्यान, संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबिय भावूक झाले होते. ईडीसोबत कार्यालयात जाताना त्यांच्या आईने त्यांचं औक्षण केलं. तो व्हिडीओ समाजमाध्यांवर चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ते आईला नतमस्तक करतानाही दिसत आहे. आईला त्यांनी घट्ट मिठीही मारली.यावरून निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.


हेही वाचा – राज्यात नक्की कोण मुख्यमंत्री?,आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्वसन प्रकरणात १०३४ कोटींची घोटाळा झाला असल्याचा आरोप संजय राऊतांवर ठेवण्यात आला आहे. तसेच, चौकशीदरम्यान त्यांच्या घरातून अकरा लाखांची रोकडही जप्त करण्यात आली. त्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर पीएमएलए कोर्टात त्यांच्या खटल्यावर सुनावणी होणार आहे.