घरदेश-विदेशसंजय राऊतांच्या अटकेचे संसदेत पडसाद, खासदार प्रियंका चतुर्वेदींनी झळकावला बॅनर

संजय राऊतांच्या अटकेचे संसदेत पडसाद, खासदार प्रियंका चतुर्वेदींनी झळकावला बॅनर

Subscribe

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने रविवारी शिवसेनाखासदार संजय राऊत यांना अटक केली. यानंतर सोशल मीडियासह राजकीय नेत्यांनीही या कारवाईविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. दरम्यान खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसंदेत फलक दाखवत भाजपवर निशाणा साधला.

प्रियंका चतुर्वेदींची टीका –

- Advertisement -

संजय राऊतांना ईडीने अटक केल्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. अधिवेशनात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अटकेविरुद्ध आवाज उठवत आहेत. राज्यसभा खसदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संसद सभागृहाबाहेर हातात बॅनर घेऊन भाजप आणि ईडीवर निशाणा साधला. ED म्हणजे Exteded Department of BJP. म्हणजेच, ईडी हा भाजपचा विस्तारीत विभाग म्हणून काम करत असल्याची टिका चतुर्वेदी यांनी केली आहे.

महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न –

- Advertisement -

शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर  प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. संजय राऊतांची अटक हे मोठे कारस्थान असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या ‘शिव संवाद’ यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघ आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -