घरमहाराष्ट्रनाशिकमविप्र : माघारीच्या दिवशी काय घडल्या घडामोडी ?

मविप्र : माघारीच्या दिवशी काय घडल्या घडामोडी ?

Subscribe
  • भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना प्रमुख पदाधिकार्‍यांमध्ये उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असताना त्यांना संचालकपदाच्या उमेदवारीवरच समाधान मानावे लागले
  • त्यांच्यासाठी चांदवड-देवळ्याचे आमदार डॉ.राहुल आहेर यांनी शिष्टाई केलेली शिष्टाई फार उपयोगी ठरली नाही
  • नाशिक पूर्वचे आमदार अ‍ॅड.राहुल ढिकले यांनी उमेदवारी जाहीर होईपर्यंत तळ ठोकला
  • दिंडोरीचे विद्यमान संचालक दत्तात्रय पाटील यांच्यासाठी ज्येष्ठ संचालक श्रीराम शेटे व जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक गणपत पाटील यांनी केलेली मोर्चेबांधणी अखेर निष्फळ ठरली
  • श्रीराम शेटे यांच्या नाराज गटाने मविप्र संस्थेच्या मुख्यालयासमोर घोषणाबाजी केली
  • काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा मविप्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांची उमेदवारी रद्द तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचा पत्ता कट
  • रवींद्र पगार यांच्यासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचेही साकडे; परंतु, अखेरच्या क्षणी पगार यांची उमेदवारी रद्द, तालुका संचालकपदही त्यांना राखता आले नाही
  • 2017 च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचा अर्ज बाद ठरवणारे सुरेश डोखळे यांना परिवर्तन पॅनलकडून उमेदवारी नाही
  • सुरेश डोखळे यांना प्रवीण जाधव ठरले सरस
  • चांदवड तालुक्यात विद्यमान संचालक उत्तमबाबा भालेराव व डॉ.आत्माराम कुंभार्डे यांच्यात चुरस रंगलेली असताना भालेरावांनी उमेदवारी पटकावली
  • तालुक्यातील सदस्यांचा कल उत्तमबाबा यांच्या बाजूने गेल्याने हा निर्णय
  • परिवर्तन पॅनलमध्येही माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल व डॉ.सयाजी गायकवाड यांच्यात चुरस रंगलेली असताना डॉ.गायकवाड यांना निष्ठेचे फळ मिळाले
  • नांदगाव तालुक्यात प्रगतीकडे सर्वाधिक चुरस रंगलेली असताना चेतन पाटील यांनी तेज कवडे व विठ्ठल आहेर यांना पिच्छाडीवर टाकत उमेदवारी पटकावली
  • निवडणुकीत सर्वाधिक मतदार असलेल्या निफाड तालुक्यातून ‘प्रगती’ व ‘परिवर्तन’ पॅनलकडून प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात
  • महिला उमेदवारांमध्ये प्रत्येकी एक निफाडचा तर दुसरा उमेदवार सटाणा तालुक्यातील असल्यामुळे तुल्यबळ लढत रंगणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -