घरताज्या घडामोडीनारायण राणे आज नाशकात जबाबासाठी राहणार गैरहजर

नारायण राणे आज नाशकात जबाबासाठी राहणार गैरहजर

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी गैरहजर राहणार आहेत. गैरहजर राहण्याचे कारण सुद्धा राणे यांनी वकिलांमार्फत नाशिक पोलिसांना दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र, राणे यांच्या वकिलांनी ते केंद्रीय मंत्री व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबर रोजी हजर राहू शकत नाहीत, असा पत्रव्यवहार नाशिक पोलिसांशी केला आहे. त्यानुसार, नाशिक पोलीस दोन दिवसांत राणे यांच्याशी बोलून पुढील तारीख देणार आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी तथा पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांनी दिली. (Narayan Rane to remain absent before nashik cyber crime police)

नाशिक पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील एफआयआरच्या अनुषंगाने एक नोटीस पाठवली होती. तसेच नारायण राणे यांना येत्या २ सप्टेंबरला नाशिकच्या पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार राणेंना येत्या दिवसांमध्ये हजेरी लावावी लागणार होती. नाशिकच्या शिवसेनेच्या महानगर प्रमुख पदावर असणाऱ्या सुधाकर बडगुजर यांनी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळेच नारायण राणे यांना नाशकात यावे लागणार होते.

- Advertisement -

बडगुजर यांच्या तक्रारीनुसार नारायण राणे यांनी महाडच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांविरोधात बदनामीकारक, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजात शत्रुत्वाची भावना निर्माण होईल असे वक्तव्य केले. तसेच त्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्र राज्यातील तसेच नाशिक शहरातील व जिल्ह्यातील विविध गटातील सदस्य व व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल. शत्रुत्व आणि दुष्टपणाची भावना निर्माण होईल अशा प्रकारे सोशल मिडियाच्या माध्यमातून विधाने ही जाणीपूर्वक प्रसारीत केली. ही वक्तव्ये सोशल मिडियावर एकल्याचे आणि पाहिल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. राणेंच्या अशा वक्तव्याने मुख्यमंत्री या घटनात्मक पदांच्या व प्रतिषठित राजकीय व्यक्तीमत्वाच्या लौकीकास बाधा आणली जात आहे. तसेच यातून शिवसेनेचीही बदनामी केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

काय होते नारायण राणेंचे विधान ?

देशाला स्वातंत्र्य मिळून किती वर्षे झाली हे बाजुला विचारावे लागते, हिरक महोत्सव आहे हे पण माहिती नाही मुख्यमंत्री यांना, कळत नसेल तर एखादा सेक्रेटरी बाजुला ठेवून बोलत जा. मी असतो तर कानाखाली चढवली असती, असे वक्तव्य नारायण राणेंनी केले. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील तसेच नाशिक शहरातील, जिल्ह्यातील विविध गटातील व्यक्तींमध्ये तेढ निर्माण होईल, शत्रुत्व व दुष्टपणाची भावना निर्माण होईल म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हे विधान प्रसारीत केले. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या घटनात्मक पदाला आणि प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वाच्या लोकीकास बाधा आणली, पक्षाची बदनामी केली अशी तक्रार नारायण राणे यांच्या विरोधात बडगुजर यांनी केली आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – नारायण राणे गैरहजर; वकिलांनी सांगितले कारण..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -