घरमनोरंजनसायरा बानो यांच्यावर लवकच होणार अँजिओग्राफी शस्त्रक्रिया

सायरा बानो यांच्यावर लवकच होणार अँजिओग्राफी शस्त्रक्रिया

Subscribe

कुटुंबियांतील निकटवर्तीय म्हणाले की, सायरा बानो अजूनही दिलीप कुमार यांच्या जाण्याच्या दुःखात आहेत.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (dilip kumar)यांच्यासोबत ५४ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या अभिनेत्री सायरा बानो (saira banu)यांना आता श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. दिलीप कुमार यांचे निधन होऊन दोन महिने झाले आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून अजून त्यांच्या पत्नी सायरा बानू काही सावरू शकल्या नाही आहेत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर खूप होत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील ICUमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.(dilip kumar wife saira banu health update)
सायरा बानो यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर नितिन गोखले यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, सायरा यांचे लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झालं आहे. यामुळे त्यांची अँजियोग्राफी करावी लागणार आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीत हळू-हळू सुधार होत आहे.आज त्यांना आयसीयू वार्डमधून बाहेर काढण्यात येणार असून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे.

मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायरा बानू यांच्या कुंटुबातील जवळील व्यक्ती वक्तव्य केलं आहे की, “आम्हाला अँजिओग्राफी करण्याची घाई नाहीये. आम्ही येत्या 4 किंवा 5 दिवसात निर्णय घेऊ.”

- Advertisement -

याचदरम्यान सायरा बानू यांच्या प्रवक्ता फैसल फारुकी यांनी बुधवारी सायरा यांच्या तब्येतीबाबत माहिती दिला व  म्हणाले की ,”दिलीप कुमार यांच्या निधनानंतर त्यांना खूप तणाव सहन करावा लागला आणि त्यामुळे त्यांच्या ओरोग्यावरही याचा गंभीर परीणाम झाला आहे”

कुटुंबियांतील निकटवर्तीय म्हणाले की, सायरा बानो अजूनही दिलीप कुमार यांच्या जाण्याच्या दुःखात आहेत. त्या ना कोणाशी काही बोलतात, ना कोणाला भेटतात. संपूर्ण जगाला विसरून त्यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना आपले संपूर्ण जग बनवले आहे. सायरा बानो यांच्यासाठी दिलीप कुमार आयुष्य होते. ५४ वर्षांपासून त्यांनी दिलीप कुमार यांची काळजी घेण्यासाठी स्वतःला व्यस्त केले होते.

- Advertisement -

हे हि वाचा – लसींचे दोन्ही डोस घेऊनही डान्स कोरिओग्राफर फराह खानला कोरोना संसर्ग

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -