घरक्राइमNashik Crime : सीसीटीव्ही फुटेजने उलगडले डॉक्टरवरील हल्ल्यामागील गुपित

Nashik Crime : सीसीटीव्ही फुटेजने उलगडले डॉक्टरवरील हल्ल्यामागील गुपित

Subscribe

नाशिकमध्ये शुक्रवारी सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाले होते. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीने कोयत्याने डॉ. कैलास राठी यांच्यावर जवळपास 18 वार केले.

नाशिक : येथील एका खासगी डॉक्टरवर अज्ञातांकडून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना राज्यभर वाऱ्यासारखी पसरली. या घटनेनंतर नाशिकमधील डॉक्टकरांनी रुग्णालये बंदची हाक दिली होती. दरम्यान या घटनेमागील सत्य समोर आलं आहे. ते आलं सीसीटीव्ही फुटेजमुळे. करण्यात आलेल्या हल्ल्याला अनैतिक संबंधाची किनार असल्याचे कळताच डॉक्टकरांनी दिलेली बंदची हाकसुद्धा मागे घेण्यात आली. (Nashik Crime CCTV footage revealed the secret behind the attack on the doctor)

नाशिकमध्ये शुक्रवारी सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास राठी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात डॉक्टर राठी हे गंभीर जखमी झाले होते. एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आरोपीने कोयत्याने डॉ. कैलास राठी यांच्यावर जवळपास 18 वार केले. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर नाशिकमध्ये खळबळ उडाली होती. तर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. आता याच प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Chandrakant Patil : वसतिगृह न मिळालेल्या मुला-मुलींना महिन्याला मिळणार सहा हजार!

हल्ल्यामागे अनैतिक संबंधाची किनार

नाशिकमधील डॉक्टर कैलास राठी यांच्यावरील हल्ल्याचे सीसीटीव्ही आता समोर आले आहेत. अज्ञातांने डॉक्टर राठी यांच्यावर कोयत्याने वार केल्याचे त्यामध्ये दिसते. दरम्यान हा हल्ला का करण्यात आला होता? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. आधी हा हल्ला पैशाच्या आर्थिक व्यवहारातून झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमधून या हल्ल्याचे कारण समोर आले आहे. डॉक्टर आणि कर्मचारी महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समोर येत आहे. त्यातूनच आरोपीने डॉक्टरांवर हल्ला केला.

- Advertisement -

हेही वाचा : Accident : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक

आयएमएचा रुग्णालय बंदची हाक मागे

या घटनेच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेने निषेध नोंदवित रुग्णालय बंदची हाक देण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन दिले जाणार होते. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून या घटनेमागील कारण पुढे आल्यानंतर आयएमएने बंदची हाक मागे घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -