घरताज्या घडामोडीAccident : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक

Accident : नवले पुलाजवळ विचित्र अपघात, आठ ते नऊ वाहनांची धडक

Subscribe

पुणे : ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नवले पुलावर एक विचित्र अपघात झाला आहे. ट्रकने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने हा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, अपघातात वाहनांचे बरेच नुकसान झाले आहे. हा अपघात शनिवारी सकाळी घडला.

हेही वाचा – Rahul Narwekar : “द. मुंबईत भाजपाचाच खासदार”, लोकसभा निवडणुकीबाबत नार्वेकरांची स्पष्ट भूमिका

- Advertisement -

कात्रजकडून (देहू रस्ता) नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नवले पुलाच्या सिग्नलच्या अगोदर हा अपघात झाला. या महामार्गावर एका ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने समोर उभ्या वाहनाला धडक दिली. या अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहने बाजूला केली. जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक विभागाच्या सूचनेकडे दुर्लक्ष…

- Advertisement -

नवले पूल चौकातून राष्ट्रीय महामार्ग ६५ आणि ४८ वरील सर्व्हिस रस्ते जोडले जातात. कात्रज चौक ते नवले पुल हा रस्ता सहा पदरी असून तीव्र उताराचा आहे. नवले चौकात येणारी वाहने वेगात येतात. त्यामुळे वेग नियंत्रित न झाल्यामुळे, ब्रेक न लागल्याने जड वाहनांकडून बऱ्याचदा सिग्नलला उभ्या वाहनांना धडक दिली जाते. अशा गंभीर अपघाताचे प्रकार याआधी घडलेले आहेत. नवले पुलाच्या भौगोलिक उतारामुळे आणि येथे घडलेल्या अपघातांच्या उपाययोजनांसाठी उपाय करणे गरजेचे असल्याचे पत्र वाहतूक विभागाचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे दिले होते. मात्र अद्याप त्यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. वास्तविक, येथे होणारे अपघात रोखण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत, ही बऱ्याच काळापासूनची मागणी आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे येथील अपघातांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही.

हेही वाचा – Sanjay Raut : ‘हातात मशाल’ घेऊन सर्वांची ‘तुतारी’ वाजवू, राऊतांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -