घरक्राइमफेसबूक फ्रेंडने केले अश्लिल फोटो व्हायरल

फेसबूक फ्रेंडने केले अश्लिल फोटो व्हायरल

Subscribe

ब्लॅकमेल करत दागिने, पैसे उकळणार्‍या तरुणावर गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक :  फेसबुकवर मैत्री झालेल्या दिल्लीतील तरुणाने नाशिक शहरातील विभक्त राहणार्‍या विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिचे अश्लिल फोटो काढून घेत ब्लॅकमेल करून दागिने व पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पीडित विवाहितेने फेसबुक फ्रेंडला भेटण्यास नकार दिला असता त्याने अश्लिल फोटो तिच्या पतीसह नातेवाईकांना पाठविले. परिणामी, संसार करण्याच्या तयारीत असलेले पती-पत्नीमध्ये अश्लिल फोटोमुळे दुरावा निर्माण झाल्याचे समोर आले आहे. वेळोवेळी ब्लॅकमेल केल्याप्रकरणी संबंधित पीडितेने थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. अखेर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.रोहित करणसिंग पांचाल (वय २८ , रा. दिल्ली) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेचे पतीसोबत किरकोळ वाद झाला होता. ती १ एप्रिल ते डिसेंबर २०२२  या कालावधीत पतीपासूून विभक्त राहत होती. दरम्यान, तिची सोशल मीडियावर संशयित रोहित पांचाल याच्याशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांमध्ये मोबाईलद्वारे संभाषण सुरु झाले. त्यानंतर संशयित रोहित पांचाल हा नाशिकमध्ये पीडित विवाहितेला भेटला असता दोघांमध्ये शारीरीक संबध निर्माण झाले. त्यावेळी संशयित रोहितने अश्लिल फोटो व व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून घेतले.

- Advertisement -

संशयित रोहित पांचाल याने पीडित विवाहितेचा सोशल मीडियाद्वारे पाठलाग करत जुलै महिन्यात तिच्या घरी येऊन मारहाण केली. त्याने धमकी देत तिच्याकडून ऑनलाईन पैसे घेतले. हे प्रकरण मिटवायचे असल्यास तिच्याकडे पैशांची मागणी केली. पीडित विवाहितेने त्याला सोन्याचे दागिने व रोकड दिली होती. त्यावेळी त्याने तिचा आयफोन मोबाईल फोडला होता.दिल्लीमध्ये असताना संशयिताने पीडित विवाहितेला मोबाईलवर व्हिडीओ कॉल करत पुन्हा अश्लिल फोटो काढले. दरम्यान, पतीने तडजोड करून संसार करण्याची तयारी दर्शविली असता पत्नीनेही पुढाकार घेतला. ही बाब पीडित विवाहितेने संशयित रोहितला सांगितली. शिवाय, तिने संशयिताला भेटण्यास नकार दिला. त्यातून संशयित रोहितचा राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात तिच्यासोबत काढलेले अश्लिल फोटो आणि व्हिडीओ तिच्या पती, मामा व आई-वडिलांना पाठविले. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करत आहेत.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -