घरताज्या घडामोडीताहराबादच्या ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण

ताहराबादच्या ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण

Subscribe

नाशिक जिल्ह्यात १४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून, बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील ३८ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याची वार्ता तालुक्यासह ताहाराबाद गावात पसरल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, तालुक्यात एकीकडे कोरोना तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पाऊस अशा त्रिधा स्थितीमध्ये नागरिक व शेतकरी सापडले असून बेजार झाले आहेत.

बागलाण तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊसाने सर्वसामान्यांसह शेतकर्‍यांची धावपळ उडाली असताना सटाणा शहरात दोन कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढल्यानंतर संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. त्यातच तालुक्याच्या ग्रामीण भागातील ताहाराबाद येथील तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने बागलाणच्या ग्रामीण भागात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ताहराबादच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी असलेल्या ३८ वर्षीय कर्मचार्‍याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने या कर्मचार्‍याची तपासणी करून त्याच्या स्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. अखेर हाती आलेल्या रिपोर्टनुसार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने मोसम खोर्‍यात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

ताहाराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने गावाच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली आहे. ताहराबाद गाव जायखेडा पोलिसांनी प्रवेशबंदी करून सील करण्यात आले आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गावातील संशयिताना तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. याशिवाय कुटुंबातील रुग्णाच्या घरातील कुटुंबीय व नातेवाईकांचेही स्वॅब तपासणी व पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -