घरमहाराष्ट्रनाशिकजिल्हा बँकेत संचालक व त्यांचे नातेवाईकच थकबाकीदार

जिल्हा बँकेत संचालक व त्यांचे नातेवाईकच थकबाकीदार

Subscribe

नाशिक : आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जाच्या खाईत लोटण्यात माजी संचालकांसह त्यांच्या नातेवाईकांनीच हातभार लावला आहे. बँकेने जाहीर केलेल्या शंभर थकबाकीदारांच्या यादीत जिल्हा बँकेचे माजी ज्येष्ठ संचालक गणपत पाटील, भाजपचे आमदार दिलीप बोरसे, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार धनराज महाले आणि राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कुटुंबांतील व्यक्तींचा समावेश आहे.

नाशिक जिल्हा बँकेचा 2022-23 आर्थिक वर्षाचा कर्ज वसुली हंगाम सध्या सुरू आहे. जिल्हा बँकेची शेती कर्जाची एकूण 1910 कोटींची रक्कम वसुलीस पात्र आहे. त्यापैकी 1370 कोटी रुपयांची जुनी थकबाकी आहे. जिल्ह्यातील मोठे व प्रभावशाली असलेले, तसेच हेतूपुरस्सर कर्ज परतफेड न करणार्‍या थकबाकीदारांवर महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम 1960 च्या नियम 101 नुसार कारवाईची मोहीम बँकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बँकेने अशा थकबाकीदार सभासदांच्या तालुकानिहाय याद्या तयार करून 100 थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात, विविध कार्यकारी संस्थेत आणि जिल्हा बँकेच्या शाखेत जाहीर करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. या व्यक्तिंनी कर्जाची परतफेड न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बँकेचे प्रशासक अरुण कदम व मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश पिंगळे यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -