घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रया अभियानातून नाशिक होणार ‘जलसमृद्ध’

या अभियानातून नाशिक होणार ‘जलसमृद्ध’

Subscribe

१५ एप्रिलपासून राबवणार लोकचळवळ

धरणांमधील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी शहरातील उद्योजक व सामाजिक संघटनांनी एकाच व्यासपीठावर येत ‘जलसमृद्ध नाशिक’ अभियान हाती घेतले आहे. गंगापूर धरण येथून १५ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता गंगावरहे गावातून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार असून १५ जून पर्यंत म्हणजेच दोन महिन्यात गंगापूर धरणात ३० कोटी लीटर साठवण क्षमता वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात नाशिककरांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यावेळी केले.

या अभियानांसदर्भात विविध स्वयंसेवी, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक, व्यापारी व व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींची सभा गंगापूर रोडवरील भोसला मिलिटरी कॅम्पसच्या मुंजे इन्स्टिट्यूट हॉलमध्ये आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीला शहरातील उद्योजक संघटना, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महापालिका आयुक्त अशोक करंजकर, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना भारतीय जैन संघटनेचे नंदकुमार साखला म्हणाले, महाराष्ट्र शासनातर्फे ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून धरणांमधील गाळ काढून तो शेतीमध्ये टाकला जातो. त्यामुळे शेतीची सुपिकता वाढते आणि धरणांमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होते. या योजनेच्या माध्यमातून नाशिकमधील बिल्डर्स असोसिएशन नरेडको, क्रेडाई तसेच शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी एकत्रितपणे गंगापूर धरणातून गाळ उपसा करण्याचे नियोजित केले आहे. त्यादृष्टीने जलसमृध्द नाशिक अभियान राबवण्यात येणार असून, या अभियानात सर्व संघटनांनी सहभागी होऊन नाशिकला जलसमृद्ध
उद्दीष्ट बनवूया असे आवाहन करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी विविध संघटनांच्या सूचना जाणून घेण्यात आल्या. यात आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके, रेम्बो फाऊंडेशनचे प्रशांत परदेशी, राहा फाऊंडेशनचे ॠषिकेश पाटील, क्रेडाईचे अध्यक्ष कृणाल पाटील, विजश्री संस्थेचे मनोज साठे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, रमेश वैश्य, अंबरीश मोरे त्याचप्रमाणे सीए असोसिएशन, टॅक्स कन्सलटंन्ट संघटनेच्यावतीने सहभाग नोंदविण्यात आला. नाशिककरांना भविष्यातील पाणी टंचाईला सामोरे जावे लागू नये तसेच नाशिकला जलसमृध्द करण्यासाठी या अभियानात सहभाग नोंदविण्याचे आश्वासन संघटनांच्या प्रतिनिधींनी दिले. जिल्हा प्रशासनाच्यावतीनेही या अभियानाकरीता सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येणार असून ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. यावेळी शहरातील विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

११ एमसीएफटी क्षमता वाढणार
एक पोकलँड मशिन दिवसभरात दहा तास काम करते. या माध्यमातून १ क्युबिक मीटर गाळ काढण्यात येतो या माध्यमातून धरणाची साठवण क्षमता १० लाख लीटरने वाढते. या अभियानाच्या माध्यमातून सुरूवातीला ५ पोकलँड मशिनच्या माध्यमातून काम सुरू करण्यात येणार आहे. दोन महिन्यात सुमारे ३० कोटी लीटर पाणी साक्षवण क्षमता वाढविण्याचे उदिदष्ट निश्चित करण्यात आले आहे. म्हणजेच सुमारे ११ दशलक्ष घनफुट पाणी क्षमता वाढणार आहे. मोहिमेला मिळणार्‍या प्रतिसादावर अधिक मशिन वाढवले जातील त्यामुळे साठवण क्षमतेत वाढच होणार असल्याचे नंदकुमार साखला यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -