घरमहाराष्ट्रनाशिकशस्त्रांसह समोरासमोर उभ्या ठाकलेल्या पुरोहितांना पोलिसांच्या बेड्या

शस्त्रांसह समोरासमोर उभ्या ठाकलेल्या पुरोहितांना पोलिसांच्या बेड्या

Subscribe

पंचवटी पोलिसांनी ७ संशयितांना केली अटक

पंचवटी: त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी करण्यासाठी आलेले यजमान पळविल्याच्या कारणावरून पौरोहित्य करणार्‍या पुजारी बांधवांच्या दोन गटांत मोठा राडा होऊन बेदम हाणामारी झाल्याची घटना शनिवारी रात्री हिरावाडीत घडली. विशेष म्हणजे, पंचवटी पोलिसांनी संशयितांच्या वाहनांची तपासणी केली असता त्यात एक गावठी कट्टा व ११ जिवंत काडतुसे तर दुसर्‍या वाहनात धारदार कोयता आढळला. यावरून पंचवटी पोलिसांनी ७ संशयितांना अटक केली आहे.

याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूरचे एक यजमान धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. त्यावेळी आपले यजमान पळविल्यावरून पुजारी भावंडांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर रात्री साडे आठ वाजता पुन्हा पौरोहित्य करणार्‍या भावंडांच्या गटांत शाब्दिक वाद झाले. त्यातून एकमेकांत हाणामारी सुरू होती. त्याच दरम्यान पंचवटी पोलिस ठाण्याचे बिट मार्शल सागर पांढरे, सचिन अहिर गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार दिसला.

- Advertisement -

त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तरीही हाणामारी सुरूच असल्याने पोलिस ठाण्यात कळविले त्यानंतर यामारहाण प्रकरणी पोलिसांनी विरेंद्र हरिहरप्रसाद त्रिवेदी, आशिष विरेंद्र त्रिवेदी, मनिष विरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्यप्रसाद तिवारी, (सर्व रा. मोकळबाबा नगर, हिरावाडी), आकाश नारायण त्रिपाठी, (केवडीबन), अनिकेत उमेश तिवारी (द्वारकेश हाईट, डेंटल कॉलेजजवळ), सचिन नागेंद्र पांडे, (तपोवन) आदींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडुन कार (क्र.एमएच १५ जीएल ८४५२), कार (क्र. एमएच१५ एचपी ४५०५) तपासणी केली असता एरटीगा कारमध्ये एक गावठी कट्टा आणि ११ जिवंत काडतुसे दुसर्‍या वाहनात धारदार कोयता आढळून आला. पोलिसांनी दोन्ही चारचाकिंसह गावठी कट्टा, कोयता असा २३ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -