घरमहाराष्ट्रनाशिकब्रह्मगिरी पर्वताला सुरक्षा कवच

ब्रह्मगिरी पर्वताला सुरक्षा कवच

Subscribe

त्र्यंबकेश्वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र घोषित

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळख असलेल्या तसेच, पर्यटनासाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरचे ९७ किलोमीटर क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकच्या ब्रह्मगिरी पर्वताला सुरक्षा कवच मिळाले असून, त्र्यंबकेश्वरसह इगतपुरी आणि कळवणचा काही भाग संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र सरकारने वनक्षेत्रांना नुकताच ‘संवर्धन राखीव’ हा दर्जा बहाल केला असून, यात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरसह कळवण व इगतपुरी तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरीसह ९७ किलोमीटर (यात वाघेरा, वरसविहीर, गोरठाण, आंबोली, वेळुंजे, अंबई, काचूर्ली, कळमुस्ते, उभाडे, आळवंड, मेटघर किल्ला, चंद्रयाची मेट, अस्वली हर्ष, हर्षवाडी, आव्हाटे, वाढोली, कोजुली, पाहीन, भिलमाळ, त्र्यंबकेश्वर इ.) परिसर संवर्धन राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, काही महिन्यात ब्रह्मगिरीला सुरुंग लावण्याचे काम सुरू होते. याला आता आळा बसणार आहे. यानिमित्त ब्रह्मगिरीला एकप्रकारे सुरक्षाकवच प्राप्त झाले, असून भूमाफियांना चाप बसणार आहे.

निसर्गप्रेमींच्या लढ्याला अखेर यश

गेल्यावर्षी त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी भागात होणार्‍या उत्खननावर निसर्गप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती आणि त्यानंतर हा विषय न्यायालयापर्यंत गेला होता. यासाठी पर्यावरणप्रेमींनी सातत्याने लढा दिला होता. तर, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्यासह वनमंत्री, वनसचिव आणि सर्व निसर्गप्रेमींची बैठक पार पडली होती. बैठकीनंतर आता यावर शासनाने राजपत्राद्वारे सूचना काढत त्र्यंबकेश्वर परिसरातील जवळपास शंभर चौरस किलोमीटर परिसर संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. त्यानुसार आता त्र्यंबकेश्वरच्या परिसरासह ब्रह्मगिरी आणि गंगाद्वारचा परिसरदेखील संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीचे जतन आणि गोदावरीचे पावित्र्य वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला अखेर यश आले आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -