घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस बंदोबस्तात पुनद जलवाहिनीचे काम सुरू

पोलीस बंदोबस्तात पुनद जलवाहिनीचे काम सुरू

Subscribe

सटाणा शहरासाठी कळवण तालुक्यातल्या पुनद धरणातून राज्य शासनाने मंजूर केलेल्या ५५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शुक्रवारी (२८ जून) पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली.

सटाणा शहरासाठी कळवण तालुक्यातल्या पुनद धरणातून राज्य शासनाने मंजूर केलेल्या ५५ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाला शुक्रवारी (२८ जून) पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिल्यानंतर कामाला सुरुवात झाली. योजनेला विरोध करण्यासाठी जाणार्‍या जलवाहिनीविरोधी कृती समिती सदस्यांना अटक केली.

या योजनेला कळवण, देवळा तालुक्यातील शेतकर्‍यांचा सुरुवातीपासूनच विरोध असल्याने मंजुरीनंतरही अनेक दिवसांपासून काम रखडले होते. उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाने मागील महिन्यात काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. मात्र, त्यावेळी आंदोलन व शेतकर्‍यांच्या तीव्र विरोधामुळे काम सुरू झाले नव्हते. गुरुवारी उच्च न्यायालयाने काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर शुक्रवारी सकाळीच पोलीस बंदोबस्तात काम सुरू झाले आहे. दरम्यान, कळवण, देवळा तालुक्यातील जलवाहिनीविरोधी कृती समिती सदस्यांनी व शेतकर्‍यांनी सकाळी गिरणा विश्रामगृहावर बैठक घेतली व विरोध दर्शवत धरणाकडे धाव घेतली. मात्र, पोलिसांनी आंदोलकांना रस्तातच अटक करुन अभोणा पोलीस ठाण्यात नेले. सायंकाळी अंदोलकांना सोडले.

- Advertisement -

यावेळी कृती समिती अध्यक्ष देवीदास पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समिती सभापती धनंजय पवार, रवींद्र देवरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव, कारभारी आहेर, माकपचे सेक्रेटरी हेमंत पाटील, मनसे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील, शांताराम जाधव, विलास रौंदळ, संदिप वाघ, विष्णु बोरसे, मोहन जाधव, महेंद्र हिरे, रामा पाटील, किशोर पवार, जितेंद्र वाघ, अण्णा पाटील, विजय जाधव, शरद गांगुर्डे, प्रविण रौंदळ, संदिप वाघ, पंकज जाधव, हेमंत पगार , रामदास पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

तीनशे पोलिसांचा फौजफाटा

धरण परिसरात अडीचशे ते तीनशे पोलिसांचा फौजफाटा, शीघ्र कृती दल तीन तुकड्या तैनात केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर अधिक्षक नीलोत्पल, अपर अधिक्षक शर्मिला खारगे-वालवलकर, सहायक जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, तहसीलदार बंडु कापसे, उपाधिक्षक सदाशिव वाघमारे, निरिक्षक प्रमोद वाघ आदीसंह यंत्रणा तळ ठोकून होती.

- Advertisement -

आज कळवण बंदचे आवाहन

जलवाहिनीला विरोध व पुनद धरण येथे शेतकर्‍यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी (29 जून) कळवण बंद पुकारला आहे. सोमवारी (१ जुलै) कळवण येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -