घरमहाराष्ट्रनाशिकसाहित्य संमेलन समिती सदस्यांची रंगीत तालीम

साहित्य संमेलन समिती सदस्यांची रंगीत तालीम

Subscribe

समिती सदस्यांनी संमेलन परिसराची पाहणी करत प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला

नाशिक:शहरात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अवघे १७ दिवस उरले आहेत. त्यामुळे संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. ४० समित्यांच्या सदस्यांनी शनिवारी (दि.१३) संमेलनस्थळी बैठक झाली. त्यात समिती सदस्यांनी संमेलन परिसराची पाहणी करत प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला.

आडगाव येथील एमईटी कॉलेजमध्ये ३ ते ५ डिसेंबर रोजी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनासाठी सुमारे ५०० नाशिककरांच्या ४० समित्या तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये सल्लागार समिती, पदाधिकारी समन्वय समिती, स्वागत समिती, सत्कार समिती, अतिथी समिती, मदत कक्ष समिती, निधी संकलन समिती, कामकाज समिती आदी समित्यांच्या समावेश आहे. या समित्यांचा समन्वय विश्वास ठाकूर आणि शेफाली भुजबळ ठेवत आहेत.

- Advertisement -

या समित्यांच्या प्रमुख आणि सदस्यांची संमेलनास्थळी शनिवारी बैठक झाली. त्यासाठी सर्व समिती सदस्यांना संमेलनस्थळी नेण्यासाठी विविध ठिकाणांहून बसची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे या बसमध्येही समिती सदस्यांनी कामकाजाविषयी चर्चा केली. संमेलनस्थळी सर्व समितीच्या प्रमुख, उपप्रमुखांना तीन दिवस होणार्‍या कार्यक्रमांची छापील रूपरेषा देण्यात आली. शिवाय, समिती सदस्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन माहिती देण्यात आली. त्यानंतर समिती सदस्यांनी कामकाजाविषयी चर्चा करत नियोजन केले. तसेच, सदस्यांनी नवनवीन कल्पनासुद्धा सुचवल्या. संमेलनस्थळी एमईटी कॉलेजमधील हिरवळीवरच बैठका घेत संवाद साधला. अनेक समिती सदस्यांनी कट्ट्यांवरच एकमेकांशी संवाद साधला. त्यामुळे संमेलनस्थळी समिती सदस्यांची गर्दी दिसून आली.

संमेलनस्थळी अशी असेल व्यवस्था:
कोरोनाच्या नियमांचे पालन करत ५० टक्के क्षमतेनुसार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य मंडपात ७ हजार साहित्यिक, रसिक प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था असणार आहे. कवी कट्टा येथे ३ हजार लोकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बालसाहित्य मेळाव्याला ३०० लोकांची व्यवस्था असणार आहे. काही हॉलची क्षमता दीडशे ते तिनशेची आहे. नाशिकच्या लेखकांचे पुस्तकांचे प्रकाशन, कलाकरांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी दोनशे स्टॉल्स असणार आहे. राज्याच्या मराठी भाषा विभागाने प्रदर्शनासाठी ५ हजार स्के. फूट जागेची मागणी केली आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -