घरमहाराष्ट्रनाशिकप्रतिमा सुधारणेसाठी गुन्हेगार सुधार योजनेस प्रतिसाद

प्रतिमा सुधारणेसाठी गुन्हेगार सुधार योजनेस प्रतिसाद

Subscribe

पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ या पोलीस ठाण्यांतील रेकॉर्डवरील ७२ गुन्हेगारांना सुधारण्याची संधी

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गुन्हेगार सुधार योजना ही भविष्यात देशभर मोठी चळवळ ठरू शकेल. पंचवटी, आडगाव आणि म्हसरूळ या तीन पोलीस ठाण्यांतील रेकॉर्डवरील ७२ गुन्हेगारांना सुधारण्याची संधी दिली जात असून, विविध ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली.

शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी हा गुन्हेगार सुधार उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत तिसरा मेळावा शुक्रवारी (दि.२४) हनुमानवाडी परिसरातील धनदाई लॉन्स येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

पोलीस आयुक्त पाण्डेय म्हणाले की, गुन्हेगार सुधार योजनेचा फायदा सर्वांनी घ्यावा. गुन्हेगारीचे पाप लवकर धुतले जात नाही. पण या उपक्रमात कायमस्वरूपी ठाणे प्रभारी यांच्या संपर्कात राहणे गरजेचे असून, पोलीस तुमच्यामागे सक्षमपणे उभे राहणार आहेत. याप्रसंगी पोलीस आयुक्त पांडेय, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संजय बारकुंड, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित, युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे संदीप गायकवाड, उद्योजक धनंजय बेळे, डॉ. शैलेंद्र गायकवाड, मनोविकार तज्ज्ञ मुक्तेश्वर दौंड, डॉ. सचिन देवरे
आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -