घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील ५ लाख बालकांना रोटासील; आजपासून मोहीम

जिल्ह्यातील ५ लाख बालकांना रोटासील; आजपासून मोहीम

Subscribe

जिल्हा रूग्णालयात लसीकरण मोहिमेस सुरुवात

अतिसारामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी रोटा वायरस या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी रोटासील लसीकरण मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २६ जुलै) जिल्हा रूग्णालयात करण्यात आला. शहर आणि जिह्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत ५ लाख बालकांना तोंडावाटे लस दिली जाणार आहे.

जिल्हा रुग्णालयात आरोग्य उपसंचालक डॉ रत्ना रावखंडे यांच्या हस्ते रोटासील लसीकरण मोहिमेचे उदघाटन झाले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, अधिसेविका सीमा काळे, महाविद्यालय प्राचार्या वंदना झींजाड यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

पावसाळ्यात अतिसार अर्थात डायरिया प्रदूषित पाण्यामुळे बालकांना अतिसाराची लागण होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात वाहून येणार्‍या पाण्यात मातीतील अनेक रसायने वाहून येतात. ते पाणी पिण्यात आल्यास बालकांवर परिणाम दिसून येतो. त्यांना जुलाब, उलट्याचा त्रास सुरु होतो. वेळेत उपचार न मिळाल्यास बालकांचा मृत्यू होतो. बालमृत्यू रोखण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरण मोहीम आरोग्य विभागतर्फे राबविली जाणार आहे.

बाळांना तीनवेळा लस द्यावी

बाल मृत्यू रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर बालकांना मोफत लसीचा पुरवठा करण्यात येणार आहे. रोटा व्हायरसची लस बालकांना तीन वेळा देणे गरजेचे आहे. बाळ दीड महिन्यांचा असताना पहिली लस, अडीच महिन्यांचा असताना दुसरी लस तर बाळ साडेतीन महिन्यांच्या बाळाला तिसरी लस देणे गरजेचे आहे. ही लस बालकांना तोंडावाटे दिली जाणार आहे.

- Advertisement -

पालकांनी या मोहिमेचा फायदा घ्यावा

जिल्हा रूग्णालयातर्फे एक वर्षाच्या आतील बाळांना रोटा व्हायरसी लस दिली जाणार आहे. जिल्हा रूग्णालया अंतर्गत उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिका रूग्णालय या ठिकाणी ही लस उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्ह्यातील पालकांनी ही लस बालकांना द्यावी. -डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -