घरमहाराष्ट्रनाशिकवेदनेवर फुंकर; चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर वारीत सुरक्षिततेसाठी नियम

वेदनेवर फुंकर; चिमुकल्याचा बळी गेल्यानंतर वारीत सुरक्षिततेसाठी नियम

Subscribe

पंढरपूरकडे मार्गस्थ सायकलवारीत प्रेम निफाडे या चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर जाग आलेल्या आयोजकांनी काही नियम ठरवून घेतले.

पंढरपूरकडे मार्गस्थ सायकलवारीत प्रेम निफाडे या चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूनंतर जाग आलेल्या आयोजकांनी काही नियम ठरवून घेतले. नाशिक सायकलिंग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांसह अनेक तज्ज्ञ, वरिष्ठांनी १८ वर्षांआतील मुलांना आता सायकलवारीत प्रवेश देणार नसल्याचे ठरवले, तसेच यापुढे सायकल वारीतील सुरक्षिततेकडे अधिक गांभीर्याने बघितले जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आजारपणानंतर इलाज करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी घेतलेली खबरदारी कधीही योग्य याचा विसर आयोजकांना पडल्याचे या घटनेवरून अधोरेखित होते.

नाशिकहून पंढरपूसाठी निघालेल्या या सायकलवारीत यंदा १५ ते २० वर्षांच्या आतील अनेक मुले दिसून येत होती. चिमुकल्यांचा हा उत्साह वाखाणण्याजोगा असला तरी थेट महामार्गावर सायकल प्रवास तोही 350 किलोमीटरचा हे कितपत योग्य यावर अनेकांनी भुवया उंचावल्या. सिन्नर बायपासजवळ झालेल्या या अपघातात प्रेम निफाडेाचा मृत्यू झाला अन् सायकलवारीत लहान मुले नकोच याबाबत अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेक जण आक्रमक झाल्यानंतर आणि एकाच बळी गेल्यानंतर अखेर यापुढे वारीत १८ वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. तसे पाहिल्यास या घटनेनंतर सायकलवारी रद्द व्हावी असे वाटले. पण तसे न होता केवळ लहानग्यांच्या सायकल जमा करण्यात येऊन त्यांना बसने मार्गस्थ करण्यात आले. काहीच्या पालकांनी तातडीने घटनास्थळी येत आपल्या मुलांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रेमच्या मृत्यूनंतर सुरक्षिततेवर चर्चा झाली आणि नियम घालून देण्यात आले, ही गोष्ट अत्यंत धक्कादायकच. एवढ्या मोठ्या इव्हेंटचे आयोजन करताना मूळात लहान मुलांना सोबत घेणे योग्य आहे का, त्यांच्या प्रवासादरम्यानच्या सुरक्षितेचे काय याचा विचार का केला गेला नाही, याबाबत सहज विचार पडतो.

- Advertisement -

याचा विचार का केला गेला नाही?

राष्ट्रीयस्तरावरील अनेक सायकल स्पर्धांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने १४ वर्षे वयाच्या मुलांसाठी फक्त १० किलोमीटर सायकलिंगचे बंधन आहे. मात्र नाशिक-पंढरपूर या तब्बल ३५० किलोमीटरच्या अंतरासाठी लहान मुलांना सोबत कसे काय घेतले जाते, याचा विचार पडतो. इतके अंतर सायकल चालविल्याने लहानग्यांच्या आरोग्याबरोबरच शारीरिक बांधणीवरही विपरीत परिणाम होतात. वाहतूक नियमांचे त्यांना ज्ञान नसल्याने त्यांच्याकडून सहाजिकच चूका होऊ शकतात ही बाब निश्चित आहे. असे असताना या गोष्टींचा विचार वारीपूर्वीच का केला गेला नाही यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

नियम असे…

  • रस्त्याच्या डाव्या बाजूनेच सायकल चालवावी.
  • पांढरा पट्ट्याला धरूनच सायकल चालवावी.
  • योग्य नियोजन आणि सक्षम नेतृत्व असावे.
  • हेल्मेट व अन्य सुरक्षा साधने जबाबदारीने वापरावीत.
  • प्रत्येक सायकलवीराला वाहतूक नियमांची समज द्यावी.
  • वेगवान वाहतुकीबाबत सर्व सायकलिस्टना कल्पना देण्यात यावी.
  • अपघातप्रवण क्षेत्रांची वारीपूर्वीच माहिती देण्यात येऊन सायकलिस्टना त्याबाबत खबरदारीच्या सूचना देण्यात याव्यात.

बेशिस्तीवर नियंत्रण हवे…

वारीत अनेक सायकलचालक वाट्टेल तेथे थांबतात, वळणावर थांबतात, सायकल चालवताना अनेक जण मोबाईलवर बोलताना दिसून येतात, मार्गक्रमण करताना नियमांचे पालन व सुरक्षा साधनांकडे दुर्लक्ष करतात, या बेशिस्तीवर आयोजकांनी नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -