घरमहाराष्ट्रनाशिककुटुंबीयांच्या काळजीने आरोपी आला शरण

कुटुंबीयांच्या काळजीने आरोपी आला शरण

Subscribe

बाललैंगिक अत्याचार घटनेतील फरार आरोपी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेताच शरण आल्याची घटना नाशिकमध्ये घडली.

बाललैंगिक अत्याचार घटनेतील फरार आरोपी पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना ताब्यात घेताच शरण आल्याची घटना नाशिकमध्ये घडली. वैद्यकीय तपासणीसाठी आणलेला हा आरोपी सिव्हीलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला होता. त्याची मानसिकता लक्षात घेत पोलिसांनी टाकलेला डाव अखेर यशस्वी झाला.

अल्पवयीन मुलीचे अपहरण व अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अशोक दत्ता पारवे याला मुंबईनाका पोलिसांनी अटक केली होती. मंगळवारी, दि. २५ जून रोजी वैद्यकीय तपासणी दोन पोलिसांनी त्याला जिल्हा रूग्णालयात आणले होते. रूग्ण व नातेवाईकांची झालेली गर्दी व एक पोलीस झेरॉक्ससाठी दुसरीकडे गेल्याची संधी साधत अशोक याने रूग्णालयाच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून पळ काढला. तो फरार झाल्याचे समजताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. त्याच्या शोधार्थ दोन पथके पुणे व परभणीकडे रवाना झाली. दोन दिवस होऊनही तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याची आई लक्ष्मी पारवे यांना आरोपीच्या पलायनास सहकार्य केल्याने ताब्यात घेतले. त्याचे वडील दत्ता नारायण पारवे व बहीण ज्योती सुदाम घाटोळ यांना पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले होते. न्यायालयाने दोघांना कोठडी सुनावत कारागृहात रवानगी केली. आई, वडील व बहिणीला अटक झाल्याचे समजताच संशयित आरोपी अशोक कुटुंबियांच्या प्रेमापोटी सरकारवाडा पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करत मुंबईनाका पोलिसांकडे त्याला सोपविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -