घरमहाराष्ट्रनाशिकसेमीफायनल मॅचवर सट्टा लावणारे गजाआड

सेमीफायनल मॅचवर सट्टा लावणारे गजाआड

Subscribe

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान केली कारवाई

क्रिकेट वर्ल्डकप २०१९ इंग्लड विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघाचे सेमीफायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहून सट्टा लावणार्‍या दोनजणांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्याकडून ७ मोबाईल, टॅब व लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील सदिच्छानगरमधील रुंग्टा सफायर इमारत क्र.२ मध्ये केली. निशिकांत प्रभाकर पगार (रा.भद्रकाली) व महेंद्र अशोक वैष्णव (रा.हिरावाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. इंदिरानगर परिसरात दोनजण क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनल मॅचवर सट्टा खेळत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांना मिळाली. त्यानुसार शहर गुन्हे शाखेने तपास सुरु केला.

दोघेजण एलईडी टीव्हीवर क्रिकेट वर्ल्डकप २०१९ इंग्लड विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघाचे सेमीफायनल सामन्याचे थेट प्रक्षेपण पहायचे. त्यांच्याकडील ७ मोबाईल, टॅब, लॅपटॉपच्या सहाय्याने सट्टा खेळणार्‍यांना सट्ट्याच्या भावाबाबत माहिती पुरवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली. त्यांच्याकडील मोबाईल, टॅब, लॅपटॉप जप्त केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

ही कारवाई पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सचिन खैरनार, महेश कुलकर्णी, बलराम पालकर, रविंद्र बागुल, येवाजी महाले, प्रवीण कोकाटे, दिलीप मोंढे आदींनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -