घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकेंद्र सरकार उभारणार "खाऊगल्ली"; ‘क्लिन स्ट्रीट फुड हब’साठी नाशिकची निवड

केंद्र सरकार उभारणार “खाऊगल्ली”; ‘क्लिन स्ट्रीट फुड हब’साठी नाशिकची निवड

Subscribe

नाशिक : ज्या अभिमानाने ‘आपलं नाशिक. माझं नाशिक’ हे नाशिककरांकडून सांगितले जाते, त्याच आत्मीयतेने नाशिकची खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी, खाद्यसंस्कृतीत लुप्त होणारी नाशिकची ठळक वैशिष्टये पुन्हा एकदा जगासमोर आणण्यासाठी नाशिकला ‘क्लिन स्ट्रिट फूड हब’ अशी नवी ओळख मिळणार आहे. केंद्र सरकारने फुड हब साठी नाशिकसह राज्यातील तीन शहरांची निवड केली आहे.

मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नाशिकची खाद्यसंस्कृती तितकीच अफलातून आहे. नाशिकची खाद्यसंस्कृती म्हटले की डोळ्यापुढे पहिल्यांदा अवतरते ती तर्रीबाज मिसळच. कधीकाळी नाशिककरांच्या पोटाची क्षुधा भागविणारी मिसळ आज नाशिकचा खाद्यपदार्थ म्हणून मान्यता पावली आहे. त्याचप्रमाणे नाशिकचा चिवडा, जिलेबी, खव्यापर्यंत मर्यादीत असलेल्या नाशिकमध्ये साऊथ इंडियन, इटालियन व अमेरिकन अशा मल्टी क्युझिन फूड्सची व्हरायटी आहे.

- Advertisement -

असे असले तरी अनेकदा खवय्ये मंडळींना जुन्या पध्दतीने बनविलेल्या पदार्थांची आठवण होते. नव्या पदार्थांची चव रेंगाळलेल्या नाशिककरांना पुन्हा एकदा जुन्या जमान्यातील पदार्थांची चव चाखता येणार आहे. मात्र अनेकदा ही दुकाने, येथील खाद्यपदार्थ बनविण्याचे साहित्य, खाद्यपदार्थ, कामगार वर्ग याबाबत स्वच्छता पाळली जाते का, हा एक मोठा प्रश्न असतो. आता मात्र, नाशिककरांना स्वच्छ अन्न बाहेरही खाता येणार असून, केंद्र सरकारने देशातील शंभर शहरांची फुड हब या उपक्रमासाठी निवड केली असून महाराष्ट्रात नाशिकसह कोल्हापूर व नांदेड या तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने रस्त्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थांची अन्न सुरक्षा व स्वच्छता या मुद्यावर फोकस केले आहे. त्या अंतर्गत राज्य सरकार व महापालिका यांच्या मदतीने ‘क्लिन स्ट्रिट फूड हब’ची निर्मिती केली जात आहे.

येथे उभारणार फूड हब

नाशिक शहरात तीन ठिकाणी फूड हब विकसित करणार असून एका हबसाठी केंद्र सरकार मनपाला एक कोटींचा निधी देणार आहे. त्यासाठी गोदाघाट, गंगापूर रोड, तपोवन यासह काही महत्वाच्या ठिकाणांचा विचार केला जात आहे. लवकरच या योजनेवर काम सुरु करावे, अशा सूचना केंद्राने पत्राद्वारे मनपाला दिल्या आहेत.

- Advertisement -

केंद्राकडून एक कोटींचे अनुदान

या योजनेसाठी केंद्राकडून प्रत्येक फूड स्ट्रिट हबसाठी एक कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी सिंहस्थापूर्वी फूड हब विकसित केले जाणार आहे. या फूड हबचे व्यवस्थापन या क्षेत्रात काम करणार्‍या व अनुभव असणार्‍या एनजीओ मार्फत केले जाईल. तसेच या ठिकाणी खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या स्टॉलधारकांना अन्न सुरक्षा व स्वच्छतेसाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येईल. कुंभमेळयासाठी देश विदेशातून भाविक पर्यटक, नाशिकला भेट देणार आहेत. त्यांना नाशिकच्या या खाद्य पदार्थांची चव फूड हबमध्ये चाखता येईल. त्या माध्यमातून जगभरात नाशिकच्या खाद्यपदार्थांची ब्रॅण्डिंग जगभरात होण्यास मदत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -