घरताज्या घडामोडीबेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला घरासमोरील पालापोचाळयात

बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला घरासमोरील पालापोचाळयात

Subscribe

जेलरोड धनराजनगर येथून ११ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धेचा मृतदेह घरासमोरील मोकळ्या जागेत पालापाचोळा टाकलेला अवस्थेत आढळ्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मंदाकिनी वसंत पाटील (६२, रा. धनराजनगर, जेलरोड, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे.

एक फेब्रुवारी रोजी मंदाकिनी पाटील भाजीपाला खरेदीसाठी घरातून बाहेर गेल्या त्या परत घरी आल्याच नाहीत. त्यांचा कुटुंबियांनी शोध घेवूनही कोठेही सापडल्या नाहीत. याप्रकरणी कुटुंबियांनी उपनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी आई बेपत्ता झाल्याबाबत सोशल मिडीयावर माहिती प्रसिद्ध केली. तसेच, परीसरात बॅनर प्रसिद्ध करत आईची माहिती देणार्‍यास ५० हजार रुपयांचे बक्षिसही जाहीर केले होते.
संदीप पाटील यांच्या घरासमोरील प्लॉटच्या मोकळ्या जागेतील पालापाचोळ्यातून दुर्गंधी येत असल्याचे मंगळवारी (दि.११) रहिवाशांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले व पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. मोकळ्या प्लॉटवरील पालापाचोळ्यात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळुन आला. पोलिसांनी चौकशी केली असता मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. मृतदेह प्लॉटसमोरीलच संदीप पाटील यांच्या आई मंदाकिनी यांचा असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -