घरमहाराष्ट्रनाशिकघरच्यांना न सांगताच मित्रांबरोबर सहलीला जाण्याचे प्रमाण वाढले

घरच्यांना न सांगताच मित्रांबरोबर सहलीला जाण्याचे प्रमाण वाढले

Subscribe

‘आपलं महानगर’च्या निरीक्षणातून समोर

नाशिक : एखाद्या सोहळ्यासाठी घरच्यांना न विचारताच मित्रांबरोबर सहलीला जाण्याचा नवा ‘ट्रेण्ड’ नाशिकमध्ये आला असून, अशा सहलींमुळे जीवही गमावण्याची वेळ आल्याच्या अनेक घटना वर्षभरात घडल्याचे ‘आपलं महानगर’च्या निरीक्षणातून पुढे आले आहे. सिन्नर जवळील मोहदरी घाटातील अपघाताची घटनाची अशाच स्वरुपाची आहे.

मित्र, मैत्रिणीचा वाढदिवस असेल किंवा मित्रांची पार्टी साजरी करण्यासाठी शहराबाहेर ठिकाणांना तरुणाई पसंती देते. त्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी गाडी घेवून जाण्याचा नवा फंडा आजमावला जातो. पार्टीचे ठिकाण हे धरणाजवळचे असते तर कधी डोंगरावरचे. साहसी युवक हे अशा ठिकाणांना पहिली पसंती देतात. मग येथूनच जीवनाचा खेळ सुरु होतो. अशा ठिकाणी पार्टी करायची परवानगी घरातील व्यक्ती देणार नाहीत, याची खात्री वाटू लागल्यानंतर घरच्यांना ‘अंधारात’ ठेवूनच हा डाव आखला जातो. एखादी अनुचित घटना घडते आणि हा डाव अर्ध्यावरच मोडतो. आपल्या मुलांवर विश्वास ठेवून आई-वडील निर्धास्त असतात; परंतु,आपल्या मुलांसोबत अप्रिय घटना घडल्याचे ऐकल्यानंतर आई-वडीलांचा विश्वासच बसत नाही. अशाच काही घटना गेल्या वर्षभरात घडल्या आहेत.

- Advertisement -

ईद सण साजरा करण्यासाठी इगतपुरीला गेलेल्या युवकांचा मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला होता. तसेच सिडकोतील मुले वाढदिवस साजरा करण्यासाठी वालदेवी धरणाजवळ गेले होते. तेथे सेल्फि काढताना पाण्यात पडल्यामुळे चारपाच युवकांचा एकावेळी मृत्यू झाला होता. हे मुलेही घरच्यांना अंधारात ठेवूनच गेली. ‘धूम स्टाईल’चा थरार, ‘सेल्फी’, ‘ट्रेकिंग’, धरण्याच्या पाण्यात फोटो काढण्याचे साहस या युवकांच्या अंगलट आल्यानेे या घटना सातत्याने घडत आहेत.मालेगावचे मुले व मुली नाशिकच्या गंगापूर धरणावर फिरण्यासाठी आले होते. त्यांच्यावरही काळाने घाला घातला. या सर्व घटनांकडे गांभीर्याने बघितले तर आई-वडीलांचा विरोध डावलून सहलींना जाण्याचा हा ‘ट्रेण्ड’ अनेकदा मुला-मुलींच्या अंगलट आला आहे. अनेक घटनांमध्येतर मुलींचा विनयभंग झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. फोटोंचा गैरवापर करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात फिरायला जाण्यापूर्वी युवकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -