घरमहाराष्ट्रनाशिकनांदूर मध्यमेश्वर धरणाचा डावा कालवा फुटल्याने हजारो क्यूसेस पाणी वाया

नांदूर मध्यमेश्वर धरणाचा डावा कालवा फुटल्याने हजारो क्यूसेस पाणी वाया

Subscribe

रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता

निफाड : रब्बी हंगामासाठी शनिवार (दि. ५) रोजी नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या डाव्या कालव्याला ३०० क्यूसेसने पाणी सोडण्यात आले होते. मात्र गेल्या कित्येक दिवसात कालव्याची दुरुस्ती न केल्यामुळे हे कालवे ठिकठिकाणी फुटत आहे. त्याचीच पुनरावृत्ती होत हा कालवा ७ कि.मी. अंतरावर म्हणजेच इकडे वस्तीच्या पुढे म्हसोबा मदिराजवळ असलेल्या मोरीचा स्लॅब कोसळल्याने हजारो क्युसेस पाणी वाया गेले असून, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नांदूर मध्यमेश्वर कालव्यावरती शेतकर्‍यांनी अवैध पाणी उपसा हा डोंगले टाकून करत असल्याने शेतकर्‍यांना पाणी वापरास मिळत आहे. त्यातच पाणी मागणी नमुना नंबर 7 हा भरला जात नाही. यास सर्वस्वी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी व अधिकारीच जबाबदार आहेत. सदरचे डोंगळे काढणेकामी स्फोटक वापरू बस्ट केले जाते. त्यामुळे कालवा भराव कमकुवत होतो. त्यामुळे कालवा फुटीचे प्रकार वाढत आहे.

- Advertisement -

याबाबत कालवा दुरुस्ती, देखभाल दुरुस्ती होत नसल्याने व अधिकारी वर्गाचे संबंधित यंत्रणेवर नियंत्रण नसल्याने पाणी चोरीचे प्रकार वाढत आहेत. यामुळेच सर्वसामान्य शेतकर्‍यांना वितरिकाद्वारे पाणी मिळत नाही. याबाबत संबंधित यंत्रणेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते वाल्मीक ठोंबरे, निवृत्ती चव्हाणके, रघुनाथ तासकर पाटील, सुधाकर रोटे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

105 वर्ष जुना झालेला गोदावरी डावा कालवा फुटल्याने हजारो क्युसेस पाणी वाया गेले. शेतजमिनीची माती वाहून गेल्याने रब्बी पिकाचे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळावी व वारंवार अशा घटना घडल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. जलसंपदा विभागाने दखल घेऊन दुरुस्ती करावी. – संजय नागरे, सारोळे थडी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -