घरमहाराष्ट्रनाशिक‘स्थायी’ तिजोरीची चावी उद्धव निमसेंकडे

‘स्थायी’ तिजोरीची चावी उद्धव निमसेंकडे

Subscribe

कल्पना पांडे यांच्या माघारीने बिनविरोध निवड

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या अपेक्षेनुरूप भाजपाच्याच हाती गेल्या असून उद्धव निमसे यांची गुरुवारी (ता. १९) बिनविरोध निवड झाली आहे. युती धर्माचे पालन करीत शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी ऐनवेळी माघार घेतली. निमसे यांना दुसर्‍यांदा स्थायी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.१८) स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापतीपदासाठी उद्धव निमसे व कल्पना पांडे यांचे अर्ज होते. विधानसभा निवडणुकीत दुही नको याचे पथ्य पाळत शिवसेनेने माघार घेतली. निमसे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांना विजयी घोेषित करण्यात आले. भाजपच्या सर्वच सदस्यांना व्हीप बजावण्यात आला होता. विरोधकांमध्ये मनसेचे अशोक मुर्तडक गैरहजर राहिले. स्थायी समितीत १६ पैकी भाजपाचे नऊ सदस्य असून शिवसेनेचे चार तर कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे एक सदस्य आहेत. उद्धव निमसे यांची निवड झाल्यानंतर महापौर रंजना भानसी, भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता सतीश सोनवणे, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, भाजप चिटणीस लक्ष्मण सावजी, सेना गटनेते विलास शिंदे, माजी सभापती शिवाजी गांगुर्डे, दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर आदींनी शुभेच्छा दिल्यात.

- Advertisement -

पक्षाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील

‘‘पक्षाने माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्नशील राहीन. शहरातील मुलभूत सुविधांवर भर देईल. सर्वांगिण विकासासाठीच माझा आग्रह असेल. देशात आणि राज्यात युतीचे सरकार असल्याने नाशिकमध्ये या निवडणुकीत शिवसेनेने माघार घेऊन चांगला संदेश दिला आहे. ’’-उद्धव निमसे, नूतन सभापती, स्थायी समिती, महापालिका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -