घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रईदगाह मैदानावर साचले पाणी, नमाजासाठी मशिदीत अतिरिक्त व्यवस्था; शहरात वाहतूक मार्गतही बदल

ईदगाह मैदानावर साचले पाणी, नमाजासाठी मशिदीत अतिरिक्त व्यवस्था; शहरात वाहतूक मार्गतही बदल

Subscribe

नाशिक : ईदनिमित्त शहरातील त्रयंबकरोडवरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करण्यात येते. गेल्या दोन दिवसांपासून शहरात रिमझिम पाउस सुरू असून ईदगाव मैदानावर पाणी साचले आहे. पुढील पाच सहा दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे ईदच्या दिवशी पाउस सुरू राहील्यास मशिदींमध्ये नजाम पठण करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुवारी (ता.२९) बकरी ईद साजरी केली जाणार आहे. मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ईदच्या तयारीस वेग आला आहे. बाजारपेठ विविध प्रकारच्या खरेदीसाठी गजबजलेली आहे. दोन दिवसापासून शहरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यात हवामान खात्याकडून आगामी पाच ते सहा दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात ईदगाह मैदानावर सामुदायिक बकरी ईदची नमाज पठण केली जाणार आहे. ईदच्या दिवशी पाऊस झाल्यास ईदची नमाज ईदगाहवर पठण होणे शक्य होणार नाही. याकरीता पावसाची शक्यता लक्षात घेता शहराच्या सर्वच मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांना नमाजपठणासाठी अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. कुणाची ईदची नमाज सुटता कामा नये. यासाठी विविध मशिदीमध्ये नमाजची वेगवेगळी वेळ ठेवण्यात आली आहे.

- Advertisement -

ईदच्या पार्श्वभुमीवर आज वाहतूक मार्गात बदल

ईदनिमित्त  सामुहिक नमाज पठण करण्यासाठी त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानात मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस वाहतूक शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण गुरुवारी (ता. २९) साजरा होत आहे. यानिमित्ताने त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानावर शहरातील शेकडो मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण करण्यासाठी येतात. यामुळे त्र्यंबक रोडवर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, त्यामुळे वाहतूक कोंडीचीही समस्या उद्भवू शकते. या मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येऊन पर्यायी मार्गांचा वापर करण्याबाबतची अधिसूचना वाहतूक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी जारी केली आहे. सदर वाहतूक मार्गातील बदल हे सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत राहतील. तसेच, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका यांना हे निर्बंध लागू राहणार नाहीत.

हे मार्ग असतील बंद
  • त्र्यंबक पोलिस चौकी ते मायको सर्कलपर्यंत रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.
  • गडकरी चौक ते मोडक सिग्नलपर्यंतचा रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.
हे आहेत पर्यायी मार्ग
  • मोडक सिग्नलकडून त्र्यंबककडे जाणारी वाहने सीबीएस, अशोकस्तंभ, गंगापूर नाका सिग्नल ते जुना सीटीबी सिग्नल मार्गे जातील.
  • मोडक सिग्नल, गडकरी सिग्नल, संदीप हॉटेल, चांडक सर्कल, मायको सर्कलमार्गे जुन्या सीटीबी सिग्नलमार्गे त्र्यंबककडे वाहने जातील.
  • चांडक सर्कलकडून गडकरी चौकाकडे जाणारी वाहने चांडक सर्कल, संदीप हॉटेल, गडकरी चौक, सारडा सर्कलमार्गे जातील.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -