दुचाकी अडवून कारमध्ये महिलेवर बलात्कार

uttar pradesh bareilly police arrested two accused in gang rape case of 19 year old girl

पुणे, मुंबई, अमरावती , ठाण्यानंतर नाशिकमध्ये दुचाकीवरुन घराच्या दिशेने निघालेल्या महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील शहा शिवारात पीडित महिला दुचाकीवरुन घराच्या दिशेने जात होती. पंचाळे-कोळपे रोडवरुन जाताना संशयित आरोपी प्रशांत राजाराम सांगळे (रा.माळेगाव, ता.सिन्नर) याने महिलेचा पाठलाग केला. त्याने महिलेच्या दुचाकीसमोर कार आडवी लावली. त्यानंतर त्याने महिलेला बळजबरीने कारमध्ये बसवले. महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता त्याने ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी संशयिताने मोबाईलमध्ये फोटो काढले. बलात्काराबाबत कुठे वाच्यता केली तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.