Gujarat New CM: कोण आहेत भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्र्यांच्या जागीच लढवली होती निवडणूक

विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांना १ लाख १७ हजार मत मिळाली होती.

know everything about gujarat chief minister bhupendra patel in marathi
Gujarat New CM: कोण आहेत भूपेंद्र पटेल, माजी मुख्यमंत्र्यांच्या जागीच लढवली होती निवडणूक

गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या बैठकीत भूपेंद्र रजनीकांत पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत सर्वाचे पटेल यांच्या नावावर एकमत झालं आहे. यानंतर केंद्रिय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुढील मुख्यमंत्री पदासाठी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. भूपेंद्र पटेल हे सध्या गुजरातमधील घाटलोदिया मतदारसंघाचे आमदार आहेत. ते २०१७ मध्ये पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. पटेल यांच्यापुर्वीच घाटलोदिया मतदार संघातून गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी निवडणूक जिंकली होती. तर त्यांच्यानंतर पटेल यांनीही त्याच जागेवरुन विजय ऐतिहासिक विजय मिळवला होता. यामुळे पटेल यांचं नाव चांगलेच चर्चेत होते.

विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या नावाची चर्चा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वामध्ये सुरु होती असे सांगितलं जात आहे. परंतु त्यांच्या नावावर भाजपच्या सर्व आमदारांच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजप बैठकीपुर्वी प्रवक्ते यामल व्यास यांना भूपेंद्र पटेल यांच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु त्यांनी म्हटलं होते की, भूपेंद्र पटेल एक आमदार आहेत. त्यांच्या नावाबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही परंतु बैठकीच्या शेवटी त्यांच्या नावाबाबत चर्चा करण्यात येईल असे यामल व्यास यांनी म्हटलं होते.

कोण आहेत भूपेंद्र पटेल?

भूपेंद्र पटेल गुजरातच्या घाटलोदियाचे विधानसभा आमदार आहेत. यापुर्वी भूपेंद्र पटेल हे अहमदाबाद अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी (एयूडीए) चे चेयरमन राहिले आहेत. तसेच पटेल यांनी अहमदाबाद महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारीही पार पाडली आहे. पटेल विजय रुपाणी सरकारमध्ये मंत्रीही होते. तसेच ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी अनेक वर्षे जोडले गेले आहेत. पटेल समाजात भूपेंद्र पटेल यांची चांगली पकड आहे. यामुळे पटेल २०१७ मध्ये भरगोस मतांनी निवडूण आले होते. विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांना १ लाख १७ हजार मत मिळाली होती. येत्या निवडणुकीत भाजपला राजकीय फायदा होईल यासाठी पटेल यांना मुख्यमंत्री करण्यात आली असल्याच्या चर्चा सुरु आहे.


हेही वाचा :  गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, भूपेंद्र पटेल होणार मुख्यमंत्री