घरमहाराष्ट्रनाशिकनाशिकच्या युवकाचा लखनऊमध्ये होरपळून मृत्यू; सातपूरमधील एक गंभीर

नाशिकच्या युवकाचा लखनऊमध्ये होरपळून मृत्यू; सातपूरमधील एक गंभीर

Subscribe

लग्नावरुन परतताना जेवायला थांबले अन् आगीच्या दुर्घटनेत सापडले

नाशिकरोड : मित्राच्या लग्नाला उत्तर प्रदेशमध्ये गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील तळेगाव येथील युवकाचा हुसैनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल रंगोलीमधील गॅसच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला असून, सातपूर येथील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर लखनऊ येथील जिल्हा रुग्णालयात उपचार आहेत. प्रकाश सुधाकर दाते (वय ३०, रा. तळेगाव, अंजनेरी, ता.त्र्यंबकेश्वर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. बादशहा शेख (२६, रा. सातपूर, नाशिक) असे जखमीचे नाव आहे.

समजलेली माहिती अशी, सातपूर येथील भोलेनाथ हॉटेल मालकाचा मुलगा आशिषसिंह राजपूत याचे लग्नासाठी त्याचे सातपूर व तळेगाव येथील आठ जण दोन वाहनांतून उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथे गेले होते. सर्वजण गुरुवारी (दि.८) लग्न आटोपून आयोध्या दर्शन झाल्यावर लखनऊ येथील हॉटेल रंगोलीमध्ये रुम बुक करुन संध्याकाळचे जेवण करण्यासाठी हॉटेलच्या खालील बिर्यानी कॉर्नर येथे आले. काहीजण जेवणासाठी गेले होते. त्यावेळी गॅस गळतीतून हॉटेलला आग लागली. त्यात बिर्यानी खात असलेले प्रकाश दाते व बादशहा शेख हे दोघे भाजले.

- Advertisement -

दोघांनाही लखनऊ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करत प्रकाशला मृत घोषित केले. तर शेख हा ७० टक्के भाजला असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी हुसैनगंज पोलीस ठाणे अधिकार्‍यांनी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल केला आहे. आग लागलेल्या बिर्यानीकॉर्नर मध्येच इतर तीन भरलेले सिलेंडर होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. प्रकाश याच्यासोबत निवृत्ती बल्लाळ, उत्तम पवार, विलास निर्वाण बाबा, सिद्धार्थ काळे, प्रकाश दाते, बादशहा शेख व संदीप पगार हे होते. प्रकाश दाते हा सातपूर येथील एका बँकेत सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहीण, चुलत भाऊ असा परिवार आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -