घरCORONA UPDATE..तर मग नाशिकमध्ये कोरोना लॅब कशासाठी?

..तर मग नाशिकमध्ये कोरोना लॅब कशासाठी?

Subscribe

नाशिकमध्ये गर्भवती महिलेचा मृत्यूच्या घटनेनंतर नाशिककरांचा संतप्त सवाल, आरोग्य विभागाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

सिन्नरहून नाशिकमधील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या २० वर्षीय गर्भवती महिलेचा २ मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, तिचा कोरोना स्वॅब टेस्ट रिपोर्ट यायला तीन दिवस लागल्याने नाशिकमध्ये कोरोना तपासणी लॅब कशासाठी, असा संतप्त सवाल नाशिककरांमधून उपस्थित केला जातो आहे.

पुण्याहून रिपोर्ट यायला दोन-दोन दिवस लागतात म्हणून लाखो रुपये खर्चून नाशिकमध्ये लॅब सुरू केली. मात्र, गर्भवती महिलेच्या बाबतीत हेच रिपोर्ट नाशिकमधून यायला तिसरा दिवस उजाडला. दररोज किमान ३०० रिपोर्टसची चाचणी करण्याची क्षमता असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मात्र, आज सुमारे ४०० रिपोर्ट्स पेंडिंग आहेत. असेच असेल तर नाशिकमध्ये लॅब सुरू करण्याचा उपयोग काय, अशी संतप्त भावना नाशिकमधून व्यक्त होते आहे.

- Advertisement -

आरोग्य यंत्रणा आहे कुठे?

सिन्नरमधील महिलेला हृदयाशी संबंधित त्रास होता, त्यातच करोनाची लक्षणेदेखील होती. अशा परिस्थितीत ती महिला गंभीर होईपर्यंत आरोग्य यंत्रणा नेमकी कुठे होती, असा सवालही आता उपस्थित होतो आहे. संबंधित महिलेला सिन्नरमध्ये कुठल्या रुग्णालयात नेण्यात आले होते का, असेल तर संबंधित डॉक्टरांना हे लक्षात आले नसेल का, असे प्रश्नही सिन्नरकरांमधून उपस्थित होत आहेत.

आता काँटॅक्ट ट्रेसिंगचे आव्हान

संबंधित गर्भवती महिलेवर निगेटिव्ह समजून अंत्यसंस्कार झाले असतील तर तिच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित सासर, माहेरचे नातेवाईक, परिचित यातील प्रत्येकाची माहिती घेऊन, त्याला शोधून त्यांची तातडीने तपासणी करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणेपुढे आहे. तसेच, उपचारादरम्यान संपर्कातील व्यक्ती, नर्स आणि तिला ज्या वाहनाने आणले असेल त्या चालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणेला तत्परतेने पाऊले उचलावी लागतील.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -