घरगणेशोत्सव 2022महत्त्वाची बातमी! लालबागच्या राजाच्या नवसाची आणि मुखदर्शनाची रांग 'यावेळी' होणार बंद

महत्त्वाची बातमी! लालबागच्या राजाच्या नवसाची आणि मुखदर्शनाची रांग ‘यावेळी’ होणार बंद

Subscribe

लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने उद्या म्हणजेच गुरूवार मध्यरात्रीपासून गणपतीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनाची रांग लालबाग सार्वजनिक गणेश मंडळाने उद्या म्हणजेच गुरूवार मध्यरात्रीपासून गणपतीचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी 6 वाजता चरणस्पर्शची रांग आणि उद्या रात्री 12 वाजता मुख दर्शनाची रांग बंद करण्यात येणार आहे. (navas and mukh darshan line of lalbaugcha raja will be closed from thursday midnight)

नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तासंतास रांगेत उभे राहून भाविक आपले मागणे बाप्पाच्या चरणी मांडतात. मात्र आता अवघ्या दोन दिवसांनी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीला वाजत-गाजत लालबागच्या राजाची मिरवणूक काढून निरोप दिला जाणार आहे. यासाठी आता विसर्जनाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे विसर्जनापूर्वी सर्व भाविकांना बाप्पाचे दर्शन व्हावे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.

लालबागचा राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी देश आणि परदेशातून भक्तगण येतात. तसेच राजकारणी आणि सेलिब्रिटीही लालबागाचा राजाचे आवर्जून दर्शन घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात लालबागाच्या राजाच्या दरबारात २४ तास गर्दी असते. गेली दोन वर्षे कोरोनाची साथ असल्यामुळे राज्यात गणेशोत्सव साजरा होऊ शकला नव्हता. मात्र, यंदा गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध नसल्याने लालबागचा राजाच्या दर्शनासाठी यंदा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

- Advertisement -

लालबागच्या राजाच्या चरणी मागील सहा दिवसांत साडेतीन कोटी रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती समोर येत आहे. लालबागच्या राजाला अनेक भाविक मोठ्या प्रमाणात दान करत असतात. काल म्हणजेच पाच दिवसांनंतर लालबागच्या राजाच्या चरणी आतापर्यंत भाविकांनी अपर्ण केलेल्या दानातून तब्बल 250 तोळे सोनं आणि 29164 ग्रॅम चांदी जमा झाल्याची माहिती समोर यते आहे.


हेही वाचा – संजय राऊत यांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज, उद्या सुनावणीची शक्यता

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -