घरमहाराष्ट्रगडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा मतदान केंद्रावर हल्ला; ३ जवान जखमी

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांचा मतदान केंद्रावर हल्ला; ३ जवान जखमी

Subscribe

मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. मतदान पथक बेस कॅम्पवर परतत असताना हा हल्ला केला. यामध्ये तीन जवान जखमी झाले.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर मोठा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तीन जवान जखमी झाले आहेत. एटापल्ली तालुक्यातील पुलसलगोंदी येथे ही घटना घडली आहे. मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ला करण्यात आला आहे. मतदान पथक बेस कॅम्पवर परतत असताना हा हल्ला केला. सुदैवाने या हल्यात जिवीतहानी झाली नाही. मात्र या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत.

गडचिरोलीतील मतदान संपल्यानंतर मतदान पथकाच्या सुरक्षेसाठी तैनात जवानांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले आहे. एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदीच्या मतदान केंद्रावरुन पथक बेस कॅम्पवर परतत असताना नक्षलवाद्यांनी त्यांना लक्ष्य केले. स्फोटात जखमी झाल्यानंतर कमांडो पथकावर गोळीबार. जवानांनी हल्ला परतावला. दुपारी तीन वाजल्यानंतर ही घटना घडली आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, धानोरा तालुक्यातील तुमडीकसा मतदान केंद्रावरील पोलिंग पार्टीवर नक्षल्यांकडून तीन ते चार राऊंड फायरिंग करण्यात आले आहे. मतदान संपवून परत येत असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या दबावामुळे नक्षली जंगलात पसार झाले. तर आज सकाळी साडेअकरा वाजता एटापल्ली तालुक्यातील कसनसून पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुगाचा स्फोट केला. सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नाही. हा स्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -