घरमहाराष्ट्रSharad Pawar Birthday: पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, म्हणाले...

Sharad Pawar Birthday: पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव, म्हणाले…

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस. ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशभरातील नेते मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, देव तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य देवो, दीर्घायुष्य देवो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.

- Advertisement -

“महाविकास आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला, आदरणीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! साहेबांचं नेतृत्वं, मार्गदर्शन आपल्या सर्वांना कायम मिळत रहावं यासाठी त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावं, अशी प्रार्थना करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट केले.

पार्थ पवारांनी आपल्या आजोबांना बरोबर १२ वाजता ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. पार्थ पवारांनी म्हटलं आहे की, देशातील एका मोठ्या उंचीच्या नेत्याला शुभेच्छा, पवार साहेब वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! आपण सर्वांसाठी प्रेरणा आहात, तरूणांना नेहमीच समाजसेवेसाठी मार्गदर्शन करत असता. आपणाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, असं पार्थ यांनी म्हटलंय.

आज वयाच्या ८० व्या वर्षी तरुणालाही लाजवेल, अशा उत्साहाने पवार साहेब रात्रंदिवस काम करत असलेले दिसतात. शरद पवार साहेब म्हणजे राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यकर्तृत्व गाजविण्याची महत्वाकांक्षा बाळगणार्‍या युवकांसाठी एक प्रेरणादायी दीपस्तंभच आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांच्या या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा उदात्त आणि थोर सामाजिक दृष्टीकोन असणारा मुत्सद्दी नेता लाभला, ही बाब अभिमानास्पद आहे. त्यांना दीर्घार्युरारोग्य लाभो, हीच वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

 

– छगन भुजबळ, मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, महाराष्ट्र राज्य

वयाची आठ दशके पार करत असताना आदरणीय पवार साहेब आजही तेवढेच उत्साही आहेत. त्यांची अविरत काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांना प्रेरणा देऊन जाते. साहेबांना निरोगी दिर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. असे ट्विट करून खासदार सुप्रिया सुळे यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा पवारांना दिल्या आहेत.

सामनाच्या अग्रलेखातून उधळली स्तुतीसुमनं

”जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८० असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात.

८० व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे ८० वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने ‘शरदबाबूं’ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे ‘हात’ नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे ‘पाय’ दिसत नाहीत.’ असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.


शरद पवार : व्यापक सामाजिक दृष्टीकोनाचा नेता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -