घरमहाराष्ट्रNCP Sign and Symbol: 'आपलं नाणं खणखणीत असेल तर'...; जयंत पाटलांकडून पक्ष...

NCP Sign and Symbol: ‘आपलं नाणं खणखणीत असेल तर’…; जयंत पाटलांकडून पक्ष आणि चिन्हाबाबत विश्वास व्यक्त

Subscribe

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपलं नाणं खणखणीत असेल, तर पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची चिंता नसते, असं ते म्हणाले

कर्जत जामखेड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीप्रकरणी निवडणूक आयोगाने काल, 6 फेब्रुवारीला मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार गटच मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं, निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. या निकालानंतर अजित पवार गट तसंच शरद पवार गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपलं नाणं खणखणीत असेल, तर पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची चिंता नसते, असं ते म्हणाले आणि कर्जत जामखेडचं नाणं खणखणीत आहे, असा विश्वासही जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केला. ते कर्जत जामखेड येथील सभेदरम्यान बोलत होते. (NCP Sign and Symbol If your coin is in a ditch Jayant Patil expressed confidence in the party and the symbol)

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील म्हणाले की, आज दुपारी तीनपर्यंत निवडणूक आयोगाला नाव द्यायचं आहे. परंतु हे नाव काही ठराविक कालावधीसाठी आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत विचारलेलं नाही. केवळ राज्यसभा निवडणुकांसाठी पक्षाचं नाव कळवायचं आहे. पक्षाचं नाव हे शरद पवारांना साजेसं, पवारांकडून येणारं नाव असणार आहे. आपल्याला ते नाव आता पुढे न्यायचं आहे. यापुढे याच नावाने आपणं ओळखले जाऊ. तसंच, जर का चिन्ह घ्यावं लागलं, तर तेही घेऊ, असं जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

- Advertisement -

जयंत पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा

जयंत पाटील म्हणाले, 1999 साली जेव्हा पक्षाचं चिन्ह म्हणून घड्याळं घेतलं,  त्यावेळी लोकांना हे चिन्ह कळावं म्हणून मी छोटी घड्याळं बनवून लहान-लहान मुलांमध्ये वाटली होती. परंतु आता मात्र चिन्हाबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण आताची जनता ही सुज्ञ आहे. लोक हुशार झाली आहेत, ती आता कामाला आणि माणसाच्या मेहनतीला मतदान करतात. त्यामुळे आपलं नाणं खणखणीत आहे, चिंता करू नका, असं ते म्हणाले.

(हेही वाचा: Maharashtra Politics : संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर, म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -