घरमहाराष्ट्र'आयत्या बिळात चंदूबा'; राष्ट्रवादी आणि भाजपचा सोशल वॉर

‘आयत्या बिळात चंदूबा’; राष्ट्रवादी आणि भाजपचा सोशल वॉर

Subscribe

मराठीत 'आयत्या बिळात नागोबा' अशी म्हण आहे. मात्र, या म्हणीत फेरफार करुन राष्ट्रवादीकडून 'आयत्या बिळात चंदूबा' असे म्हणण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात टीका-टीप्पण्याच्या फैरी झडू लागल्या आहेत. हे आरोप-प्रत्यारोप आता प्रचारसभांपर्यंत मर्यादित न राहता सोशल मीडियावर देखील सुरु झाले आहेत. भाजपने आज सकाळी शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीने देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणारी पोस्ट शेअर केली आहे. मराठीत ‘आयत्या बिळात नागोबा’ अशी म्हण आहे. मात्र, या म्हणीत फेरफार करुन राष्ट्रवादीकडून ‘आयत्या बिळात चंदूबा’ असे म्हणण्यात आले आहे. राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. ‘म्हणजे कोथरुडमध्ये चंपा जे करताहेत ते’ असे देखील राष्ट्रवादीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

कोथरुड मतदारसंघावरुन टीका?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे आहेत. मात्र, भाजपकडून त्यांना पुण्याच्या कोथरुड मतदारासंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघात मेधा कुलकर्णी या भाजपच्या विद्यमान आमदार आहेत. याशिवाय इथे ब्राम्हण समाजाची संख्या जास्त आहे. या समाजाचे बऱ्यापैकी मतदार भाजपला मतदान करतात. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी सेफ समजला जातो. त्यामुळे भाजपकडून या मतदारसंघात मेधा कुलकर्णी यांच्याऐवजी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रकात पाटील यांना राष्ट्रवादीने ‘आयत्या बिळात चंदूबा’ असे म्हटले आहे.

भाजपचे ‘रम्याचे डोस’ सदर

भाजपने ट्विटरवर ‘रम्याचे डोस’ नावाचे सदर सुरु केले आहे. यामार्फत भाजप विरोधकांवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रम्याचे डोसच्या मथळ्याखाली विरोधकांवर टीका केली आहे. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धोबीपछाड देणारे एकच पैलवान आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – भाजपच्या रम्याचे विरोधकांना डोस आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -