घरमुंबईभाजपच्या रम्याचे विरोधकांना डोस आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक

भाजपच्या रम्याचे विरोधकांना डोस आणि मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Subscribe

विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपने ट्विटरवर 'रम्याचे डोस' नावाचे सदर सुरु केले आहे. यामार्फत भाजप विरोधकांवर निशाना साधत आहेत.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली आहे. जसजशी निवडणूक अंतिम टप्प्यावर येत आहे, तसतसे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपने प्रचारसभांबरोबरच सोशल माडियावर देखील विरोधकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधकांवर टीका करण्यासाठी भाजपने ट्विटरवर ‘रम्याचे डोस’ नावाचे सदर सुरु केले आहे. यामार्फत भाजप विरोधकांवर निशाणा साधत आहेत. आता पुन्हा भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर रम्याचे डोसच्या मथळ्याखाली विरोधकांवर टीका केली आहे. मात्र, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धोबीपछाड देणारे एकच पैलवान आहेत, असे भाजपने म्हटले आहे.

नेमके काय आहे रम्याचे डोस?

रम्याचे डोसमध्ये भाजपने दोन लोकांचे संभाषण दाखवले आहे. या संभाषणात नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. या संभाषणात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणतो, ‘तुला माहितेय का? देवेंद्रजी गेल्या ४७ वर्षांतले महाराष्ट्राचे असे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी आपला कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण केला आहे. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे हे वेगळं सांगायलाच नको.’ त्यानंतर दुसरी व्यक्ती म्हणते, ‘गेल्या पाच वर्षांत हे सरकार अस्थिर करण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण विकासाची प्रक्रिया कुठेही थांबू न देता सगळ्या पैलवानांना देवेंद्रजींनी त्यांच्याच आखाड्यात असा धोबीपछाड दिलाय की काहींचा तोल गेलाय तर काही थकल्याभागल्याची भाषा करतायत.’ भाजपच्या या ट्विटनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपच्या ‘रम्याच्या डोस’ला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे बघायला मिळत आहे.

- Advertisement -


हेही वाचा – शिवसेना विरोधातील ‘ते’ वक्तव्य भोवलं; हर्षवर्धन जाधव यांच्यावर गुन्हा दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -