घरमहाराष्ट्रनितेश राणेंची पोलीस कोठडीत रवानगी

नितेश राणेंची पोलीस कोठडीत रवानगी

Subscribe

नितेश राणेंनी रस्ते उपअभियंत्यावर चिखल टाकल्याप्रकरणी त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीजवळ रस्ते अभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणं आमदार नितेश राणेंना चांगलंच महागात पडलं आहे. या प्रकरणी त्यांचे वडील नारायण राणे यांनीच त्यांचे कान टोचल्यानंतर ते कणकवली पोलिस स्टेशनमध्ये गुरुवारी संध्याकाळी हजर झाले होते. पोलिसांनी त्यांना अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केलं. नितेश राणेंनी केलेला जामीन अर्ज फेटाळत न्यायालयानं त्यांची थेट पोलीस कोठडीमध्ये रवानगी केल्या आहे. ९ जुलैपर्यंत नितेश राणेंना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय झालं होतं?

या परिसरात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांसाठी नितेश राणेंनी त्यांच्या ४० ते ५० कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना जाब विचारण्यासाठी महामार्गावरच घेराव घातला. यावेळी नितेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी शेडेकर यांच्यावर चिखल ओतला. ‘आता तुला कळेल चिखल अंगावर पडणं म्हणजे काय असतं’, असं म्हणत नितेश राणेंनी शेडेकर यांना दम दिला. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याची चर्चा झाली. दिल्लीत या प्रकरणावर खासदार नारायण राणेंना विचारले असता त्यांनी नितेश राणेंचे कान टोचत या प्रकाराचा निषेध केला.

- Advertisement -

नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातली चिखलाने आंघोळ

नितेश राणेंनी अधिकाऱ्याला घातली चिखलाने आंघोळ

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಜುಲೈ 4, 2019

जामीन अर्ज फेटाळला!

दरम्यान, वडिलांनीच कान टोचल्यानंतर नितेश राणे स्वत: कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर गोंधळ घातला. दरम्यान पोलिसांनी नितेश राणेंना अटक केल्यानंतर त्यांना काही काळासाठी हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी सकाळी जेव्हा त्यांना कोर्टात सादर करण्यात आलं, तेव्हा त्यांचा जामीन अर्ज फेटाळत न्यायालयाने त्यांची रवानगी ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत केली. दरम्यान, पोलिसांनी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने चारच दिवसांची कोठडी सुनावली आहे. ‘चिखलफेक प्रकारात नितेश राणेंचा काहीही संबंध नव्हता, लोकांच्या त्रासाची जाणीव करून देण्यासाठी जमावाने चिखल फेकला’, असं सांगत नितेश राणेंच्या वकिलाने त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांची बाजू फेटाळून लावली.


हेही वाचा – अभियंत्यावर चिखलफेकीनंतर नितेश राणे रुग्णालयात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -