घरमहाराष्ट्रअभियंत्यावर चिखलफेकीनंतर नितेश राणे रुग्णालयात

अभियंत्यावर चिखलफेकीनंतर नितेश राणे रुग्णालयात

Subscribe

उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे नितेश राणेंना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अटकेनंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उपअभियंत्यावर चिखलफेक केल्यामुळे आमदार नितेश राणे यांना गुरुवारी संध्याकाळी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अधिकाऱ्याला मारहाण केल्यामुळे नितेश राणे यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे नितेश यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी अधिकाऱ्याची माफी मागितली आहे. महामार्गावरील आंदोलन बरोबर आहे. मात्र, नितेश यांची कृती चुकीची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंसाचार आणि गोंधळाच्या आंदोलनाचे मी कधीही समर्थन करणार नाही, असेही नारायण राणे म्हणाले.

नितेश राणेंना आज कोर्टात हजर करणार

आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांविरोधात केलेल्या आंदोलनात उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधून त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. त्यामुळे नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३४२, ३३२, ३२४, १४७, १४३, १४८, १४९, ३२३, १२० ब, ५०४, ५०६ आणि सर्वाजनिक मालमत्तेचे नुकसान अधिनियम (३) नुसार नितेश राणे , नगरसेविका मेघा गांगण, संदीप मेस्त्री, मामा हळदिवे, निखिल आचरेकर, संदीप सावंत या सहा जणांसह अन्य ५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज शुक्रवारी त्यांना कोर्टात हजर करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -