घरमहाराष्ट्रनितेश राणेंचा अंधारे, पवार, ठाकरेंवर निशाणा; म्हणाले देवतांची बदनामी करण्याचं सर्टिफिकेट...

नितेश राणेंचा अंधारे, पवार, ठाकरेंवर निशाणा; म्हणाले देवतांची बदनामी करण्याचं सर्टिफिकेट…

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे सत्ताधाऱ्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांनी हिंदू देवी-देवता आणि संतांविरोधात केलेल्या भाषणांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं जातंय. भाजपा आमदार नितेश राणे यांनी आता एक व्हिडीओ ट्विट करत सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. तसंच, याच ट्विटमधून त्यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही रोख आहे.

नितेश राणे यांनी ट्विट केलेला व्हिडिओ हा शनिवारी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या महामोर्चाचा आहे. महामोर्चाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते नाना पटोले, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेही उपस्थित होत्या. सुषमा अंधारे यांनी पुढे येत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आधी शरद पवार आणि मग उद्धव ठाकरे यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावरूनच नितेश राणे यांनी सुषमा अंधारे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

- Advertisement -

हा व्हिडीओ शेअर करताना नितेश राणे म्हणाले की, “तर मग खरंच होतं. संतांची आणि हिंदू देवी देवतांची बदनामी करण्यासाठी सर्टिफिकेट येथूनच मिळते.”

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -