घरनवी मुंबईतुर्तास राज्यात ऑक्सिजनची गरज नाही

तुर्तास राज्यात ऑक्सिजनची गरज नाही

Subscribe

- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबईसह राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झापाट्याने वाढ होत आहे. रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी राज्याला तुर्तास ऑक्सिजनची गरज भासली नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला केले आहे.

ऐरोली येथे भारत सीरम्स अँड व्हॅॅक्सिन्स बायोफार्मास्युटिकल (बीएसव्ही) कंपनीचे जागतिक दर्जाचे आर अँड डी केंद्र उभारण्यात आले असून केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केले. बीएसव्ही या भारतातील नावाजलेल्या कंपनीने, आरोग्य सेवा पुरवणार्‍या कंपनीने आतापर्यंत विविध संशोधनातून लस निर्माण केली आहे. कोरोनाच्या कालावधीत देखील सीरम्सचे योगदान हे महत्वाचे ठरले आहे.

- Advertisement -

असे सांगत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या कंपनीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन टोपे यांनी दिले. बीएसव्हीच्या माध्यमातून सध्या कोविड १९ अँटीबॉडीज विकासाचे काम करत आहे. भविष्यातही कोविडच्या लाटांविरोधात लढण्यासाठी बीएसव्हीच्या माध्यमातून अँटीबॉडीज निर्माणासाठी संशोधन केले जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. यावेळी आर अँड डीचे प्रमुख डॉ. जे. बी. जेकब, बीएसव्हीचे व्यवस्थापकीय संचालक संजीव नवांगुळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -