घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमध्य रेल्वेचा ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगा ब्लॉकच; १० रेल्वे रद्द

मध्य रेल्वेचा ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगा ब्लॉकच; १० रेल्वे रद्द

Subscribe

5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी असणार मेगा ब्लॉक

भुसावळ : मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी हा मेगा ब्लॉक असेल. या मेगाब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि माल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

यात भुसावळ विभागातील दहा गाड्यांचा समावेश आहे. या 72 तासांच्या जम्बो मेगा ब्लॉकचे कारण म्हणजे ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान, पाचव्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे या स्थानका दरम्यान सहाव्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. या जम्बो मेगा ब्लॉकमुळे
कोकणात जाणार्‍या काही गाड्याही या तीन दिवसांत रद्द होऊ शकतात.

- Advertisement -

या रेल्वे झाल्या रद्द

शनिवारी (दि.5) 12112 अमरावती – मुंबई मेल एक्सप्रेस, 12140 नागपूर-मुंबई सेवाग्राम मेल एक्सप्रेस, 17611 नांदेड-मुंबई राज्यराणी मेल एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. शनिवार (दि.5) आणि रविवारी (दि.6) 12071 मुंबई-जालना मेल एक्सप्रेस, 12072 जालना-मुंबई मेल एक्सप्रेस, 12109 मुंबई-मनमाड मेल एक्सप्रेस, 12110 मनमाड-मुंबई मेल एक्सप्रेस, 12111 मुंबई-अमरावती मेल एक्सप्रेस, 12139 मुंबई – नागपूर सेवाग्राम मेल एक्सप्रेस, 17612 मुंबई-नांदेड राज्यराणी मेल एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -