घरमहाराष्ट्रजळगावात हॉस्पिटलमध्येच छय्या छय्या, पाहा व्हिडिओ!

जळगावात हॉस्पिटलमध्येच छय्या छय्या, पाहा व्हिडिओ!

Subscribe

जळगावमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बालकांच्या विभागात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी लावण्यांच्या गाण्यांवर ठेका धरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामान्यपणे कोणत्याही हॉस्पिटलमध्ये शांतता राखण्याचं आवाहन केलं जातं. मोठ्या आवाजाचा रुग्णांना त्रास होतो असा तर्क त्यामागे असतो. अगदी रुग्णालयाजवळूनही मोठ्या आवाजात गाणी वाजवणं, हॉर्न वाजवणं याला बंदी घातली जाते. पण जळगावमध्ये सरकारी रुग्णालयात स्पीकरवर सिनेमाची गाणी लावून रुग्णालयाच्याच कर्मचाऱ्यांनी ठेका धरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार नुकत्याच जन्माला आलेल्या किंवा एक वर्षाखालील लहान मुलांच्या वॉर्डमध्ये सुरू असल्यामुळे या कर्मचाऱ्यांवर सगळीकडून टीका होऊ लागली आहे.

महिला कर्मचाऱ्यांचा लावणीवर ठेका!

सोमवारी जळगावमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठमोठ्याने गाणी लावून रुग्णालयातल्याच महिला कर्मचाऱ्यांनी छय्या छय्या गाण्यावर ठेका धरला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला.

- Advertisement -

हा व्हायरल व्हिडिओ पाहिलात का? – ताडोबात वाघिणीने केली सांबराची शिकार!

आरोग्य अधिकाऱ्यांना माहितीच नाही, हा कसला कारभार!

यासंदर्भात ‘आपलं महानगर’ने महाविद्यालयाचे डी. एन. खैरे यांच्याशी संपर्क साधला असता ‘याबाबत आपल्याला काहीही माहिती नसून माहिती घेऊन सांगतो’, असं सांगत त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. सामाजिक कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालिका अर्चना पाटील यांच्याकडे व्हॉट्सअॅपवर तक्रार दाखल केली. ‘नियमानुसार अशा प्रकारे हॉस्पिटलमध्ये कार्यक्रम घेता येत नाही. त्यातून लहान बालकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहातो’, असे पाटील यांनी त्यावर सांगितले. त्यावर आरोग्य अधिकारी किरण पाटील यांनी ‘यासंदर्भात तपास करून सांगतो’, असं सांगितलं. या प्रकारामुळे जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातल्या अजब कारभारावर चर्चा होऊ लागली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -