घरमुंबई'महालक्ष्मी सरस' बचत गटांची हक्काची बाजारपेठ- पंकजा मुंडे

‘महालक्ष्मी सरस’ बचत गटांची हक्काची बाजारपेठ- पंकजा मुंडे

Subscribe

पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 'ई-सरस'च्या माध्यमातून ग्राहकांना महालक्ष्मी सरसमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांची ऑनलाईन ऑर्डर देता येणार आहे.

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज (सोमवार) दुपारी मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. दरवर्षी मुंबईमध्ये भरवल्या जाणाऱ्या ‘महालक्ष्मी सरस’ या भव्य प्रदर्शनाचा मुद्दा त्यांनी यावेळी केंद्रस्थानी ठेवला होता. येत्या २३ जानेवारीपासून मुंबईत ‘महालक्ष्मी सरस प्रदर्शन आणि विक्री’ला सुरूवात होणार असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. वांद्रे संकुल येथील MMRDA मैदानात २३ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की ‘सरस प्रदर्शन हे बचत गटांसाठी हक्काची बाजारपेठ आहे. यानिमित्ताने बचत गटातील उद्योजकांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी हक्काचा बाजार मिळतो. दुष्काळी भागातील महिला सरस प्रदर्शनीच्या माध्यमातून बचत गटाद्वारे त्यांनी बनवलेल्या वस्तूंची विक्री करतात आणि पैसे कमावतात.’

मुंबईकरांनाही असते ‘सरस’ची प्रतीक्षा

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की ‘मुंबईकरदेखील महालक्ष्मी सरसची दरवर्षी तुरतेने वाट बघत असतात. गेल्या दीड दशकात महालक्ष्मी सरसच्या प्रदर्शनात अंदाजे ७,५०० स्वयं सहाय्यता समूहांनी मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्या वर्षी या प्रदर्शनात ५० लाखांची आर्थिक उलाढाल झाली होती. तर मागील वर्षी या प्रदर्शनाने १० कोटींच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा पार केला आहे.’

- Advertisement -

‘ई-सरस’ची देखील सुविधा

पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता ‘ई-सरस’च्या माध्यमातून ग्राहकांना महालक्ष्मी सरसमध्ये मिळणाऱ्या उत्पादनांची ऑनलाईन ऑर्डर देता येणार आहे. त्यामुळे महालक्ष्मी सरसची वर्षभर वाट पाहण्याची गरज नाही. दरम्यान, ‘समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नाव द्या’ या धनंजय मुंडेंच्या मागणीवर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशी त्यांची मागणी काहीही असली तरी सरकार योग्य तोच निर्णय घेईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -