घरमहाराष्ट्रतुला कायमचं संपवून टाकू; खासदार निंबाळकरांसह जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

तुला कायमचं संपवून टाकू; खासदार निंबाळकरांसह जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र

Subscribe

उस्मानाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकांवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि गावातील ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवाराला जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात प्रचारादरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. ग्रामपंचायती निवडणुकीतील राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे आणि त्यांच्या आई कांताबाई साळवे यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीने हे धमकीचे पत्र चिकटवले आहे. निवडणुकीतून माघार घे पाठिंबा दे, नाही तर अवघड होईल, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.

नेमकी धमकी काय?

ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. शेवट पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा शाजदार ओम बाळ, तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू. हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरलापण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय…? अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.

- Advertisement -

पत्रात निंबाळकरांना बाळ असे का संबोधले?

एका वहीच्या पानावर लिहून हे धमकीचे पत्र देण्यात आलं आहे. या पत्रात खासदार ओमराजे निंबाळकर यांना बाळ असे संबोधण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ओमराजे निंबाळकर आणि राणा रणजित सिंह पाटील यांच्यात उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात खडाजंगी झाली होती. यावेळी पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा बाळ असा उल्लेख केला होता. नेमका तोच शब्द इथे वापरण्यात आल्याचे सांगितले जातेय.

तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्दमध्ये स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून रामेश्वर वैद्य हे सरपंच म्हणून बिनविरोधात निवडून गेले. विशेष म्हणजे 11 पैकी 7 जागाही बिनविरोधात निवडल्या गेल्या. आता उर्वरित 4 जागांसाठी 2 पॅनल रिंगणात आहेत. त्यासाठी 2800 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यातील एका जागेवर ज्ञानेश्वर साळवे रिंगणात आहेत. त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी, नाही तर अवघड होईल असा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे.


संजय राऊतांच्या वक्तव्याने अफगाणी संकट आलं, आशिष शेलारांचे टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -